Pune : एम्पॉवरमेंट समिट 2024′ व ‘महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार’ सोहळ्याचे सोमवारी आयोजन

एमपीसी न्यूज – एमआयटी एटीडी विद्यापीठ संचालित स्कूल ऑफ लॉ व बृहन महाराष्ट्र अकादमी (Pune) यांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या सहकार्याने ‘एम्पॉवरमेंट समिट 2024’ व ‘महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन येत्या सोमवारी दि. 5 फेब्रुवारी रोजी  करण्यात आले आहे.

5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता एमआयटी एटीडी विद्यापीठ, विश्वराजबाग, लोणी काळभोर, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती महिला बालविकास अधिकारी मोनिका रंधवे व ‘एमआयटी स्कुल ऑफ लॉ’च्या प्रमुख डॉ. सपना देव यांनी दिली. प्रसंगी बृहन महाराष्ट्र अकादमीचे अध्यक्ष शशिकांत कांबळे, एम. तिरुमल आदी उपस्थित होते.

मोनिका रंधवे म्हणाल्या, “या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे (Pune), तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, महिला आणि बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, राष्ट्रीय मानव अधिकाराचे डॉ. ज्ञानेश्वर मुळे, महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर, एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. सुनीता कराड आदींची विशेष उपस्थिती असणार आहे.”

शशिकांत कांबळे म्हणाले, “वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय  काम करणाऱ्या महिलांना ‘महाराष्ट्र कन्यारत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या महिला विभागाच्या संगीता पाटील, केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या संचालक झेलम चौबळ, झेप फाऊंडेशन मुंबईच्या डॉ. रेखा चौधरी, ‘सिफा सिंगापूर’च्या अध्यक्षा डॉ. शिल्पा स्वार, ग्रॅव्हिट्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा उषा काकडे, उद्योजिका राजश्री गायकवाड यांचा समावेश आहे.”

Tata Motors : फुटबॉल स्पर्धेत टाटा मोटर्स संघ विजयी

डॉ. सपना देव म्हणाल्या, “समिटमध्ये पुरस्कार वितरण झाल्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये सोशल मीडिया, सायबर क्राईम आणि स्त्रीयांची मानसिकता यावर परिसंवाद आयोजित केला आहे. कायदेशीर प्रक्रियांचे प्रशिक्षण, ऑनलाइन सुरक्षेशी संबंधित कायदेशीर प्रक्रियांचे व्यावहारिक प्रशिक्षण देतील, गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी कायदेशीर कारवाई करण्यासाठी महिलांना ज्ञान आणि कौशल्ये सुसज्ज करतील. सायबर कायद्यांचा प्रचार करणे, कायदेशीर संस्थांसोबत सहयोग, कायदेशीर संसाधने तयार करणे, गोपनीयतेची चिंता संबोधित करणे, आंतरराष्ट्रीय कायदेशीर मानके, कायदेशीर अंमलबजावणीचे निरीक्षण करणे अशा विविध विषयांवर या चर्चासत्रांमध्ये उहापोह केला जाणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.