Tata Motors : फुटबॉल स्पर्धेत टाटा मोटर्स संघ विजयी

एमपीसी न्यूज – औद्योगिक क्रीडा संघटनेच्या फुटबॉल (Tata Motors) स्पर्धेत टाटा मोटर्सचा ए संघ विजयी ठरला. या स्पर्धा टाटा मोटर्सच्या क्रीडांगणावर संपन्न झाल्या.

टाटा मोटर्स ए यावर्षीचा औद्योगिक क्रीडा संघटनेच्या फुटबॉल स्पर्धेचा विजेता ठरला. तर फोरविया संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेमध्ये ॲटलस कॉपको, फोरव्हिया, एसकेएफ, प्राज इंडस्ट्रीज, सँडविक एशिया, थरमॅक्स, मुनेश्वर फॅक्टरी, बजाज ऑटो, वाळूज, टाटा मोटर्स ए, टाटा मोटर्स बी, थायसनकृप या संघांनी सहभाग घेतला.

Talawade : आराध्या भांडवले या विद्यार्थिनीला नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक

टाटा मोटर्स ए संघ आणि फोरविया संघ अंतिम फेरीत पोहोचले. टाटा मोटर्स ए (Tata Motors) संघाने हा सामना 7-6 असा सडनडेथ मध्ये जिंकला. टाटा मोटर्स ए संघाकडून शाहिद शेख, गौतम कृष्णा, उद्धव भोसले, अर्णबकुमार, डीब्यो घोष, मार्टिन जॉन, उदय शिंदे यांनी गोल केले. तर फोरविया संघाकडून प्रतीक धामे, शिवम, निरंजन भोसले, श्रेयस गुरव, विनोद पिल्ले, रौनक देसाई यांनी गोल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.