Nigdi : औद्योगिक क्रीडा संघटनाची 60 वी शुटींग व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न

एमपीसी न्यूज : औद्योगिक क्रीडा संघटनेची 60 वी व्हॉलीबॉल (शूटिंग) स्पर्धा, (Nigdi) मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, निगडी प्राधिकरण येथे संपन्न झाली. या स्पर्धेस टाटा मोटर्स, एस केएफ, सीएएफव्हींडी, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक इंडिया, बजाज ऑटो( वाळुंज), सेचुरीएंका, पीसीएमसी, सँडविक एशिया, बजाज ऑटो वाळुंज, पीएमपीएमएल अशा विविध कंपन्याच्या 14 संघानी भाग घेतला होता. ही स्पर्धा फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, इंडियाने पुरस्कृत केली आहे.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक पीसीएमसी, द्वितीय क्रमांक फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, तृतीय क्रमांक टाटा मोटर्स संघाला मिळाला. डॅन फाॅस, पीएमपीएमएल ‘ए’, टाटा मोटर्स ए’, सीएएफव्हीडी, पीएमपीएमएल ‘ब” संघांना अनुक्रमे चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा क्रमांक मिळाला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सचे डिजीएम एचआर विश्वनाथ येरवा व औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या हस्ते झाले.

यावेळी टाटा मोटर्स युनियन अध्यक्ष शिशुपाल तोमर, जनरल सेक्रेटरी अजित पायगुडे, युनियन प्रतिनिधी चेतन बालवडकर, डॉनफाॅसचे युनियन प्रतिनिधी सुजित साळुंखे, महेश देसाई, आप्पासाहेब कमळेकर, औद्योगिक क्रीडा संघटनाचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम, स्पर्धा प्रमुख हरी देशपांडे, खजिनदार प्रदीप वाघ उपस्थित होते.

या स्पर्धेस नंदकुमार भोईटे, भाऊसाहेब जाधव व के.डी.वाघमारे (सर्व राष्ट्रीय पंच), राज्यस्तरीय पंच राजू सोडळ व राजेंद्र मांगडे, राष्ट्रीय खेळाडू अनिल सोनीकर, अनिल पिसाळ हेही उपस्थित होते. या स्पर्धेस सारंग नाईक, माऊली पवळे, तुकाराम राऊत, बाळासाहेब भोंडवे, सुनील मेहत्रे, अनिल राऊत यांचे मोलाचं सहकार्य लाभले आहे.
या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील सामन्याचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

Pune : नमो चषक अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश बनकर याची ‘कोथरूड श्री’ स्पर्धेत बाजी

1) फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स विरुद्ध डॅन फाॅस पिंपरी यांत झालेल्या सामन्यात (Nigdi) फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्सने 2-0 (15-8, 15-10) जिंकली.
2) दुसऱ्या उपांत्य फेरीत पीसीएमसी विरुद्ध टाटा मोटर्स ‘ब’ यांत झालेल्या सामन्यात पीसीएमसी 2-0(15-5, 15-09)ने जिंकली.
3) अंतिम सामन्यांमध्ये पीसीएमसी विरुद्ध फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स यांत झालेल्या सामन्यात पीसीएमसी ने 2-0(15-6, 15-05) गुणांनी विजय मिळवून विजेतेपद पटकावले.

फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धा पाहण्यासाठी खेळाडू व प्रेक्षकांची भरपूर गर्दी होती. डावीकडून वसंत ठोंबरे, नरेंद्र कदम, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे जीएम एच्आर श्री विश्वनाथ येरवा, नंदकुमार भोईटे, भाऊसाहेब जाधव, के.डी.वाघमारे, तुकाराम राऊत, अनिल राऊत विजेत्या संघासोबत दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.