Pune : नमो चषक अंतर्गत शरीर सौष्ठव स्पर्धेत गणेश बनकर याची ‘कोथरूड श्री’ स्पर्धेत बाजी

एमपीसी न्यूज – तरुणांना व्यायामाचे (Pune)  महत्व पटवून देण्यासाठी शरीर सौष्ठव स्पर्धेसारखे क्रीडा प्रकार उपयुक्त असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. तरुणांनी व्यसनांच्या आहारी न जाता आपल्या शरीराकडे लक्ष द्यावे व निरोगी आयुष्य जगावे यासाठी नमो चषक अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या असल्याचेही ते म्हणाले.

नमो चषक अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात “कोथरूड श्री” या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी त्यांनी भाजयुमोचे क्रीडा आघाडीचे शहर प्रमुख प्रतीक खर्डेकर आणि पुणे जिल्हा हौशी शरीर सौष्ठव संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नांगरे यांचा विशेष सत्कार केला.

तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणार असल्याचेही जाहीर केले. यावेळी भाजपचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, पुणे शहर (Pune) सरचिटणीस पुनीत जोशी, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसूले, कोथरूड मंडल भाजपा अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार, भाजप नेते धनंजय जाधव,कामगार आघाडीचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब टेमकर, युवा मोर्चाचे कोथरूड मंडल अध्यक्ष अमित तोरडमल, क्रीडा आघाडीचे योगेश कंठाळे, अनिश अगरवाल, मंडल उपाध्यक्ष शंतनू खिलारे, राजेंद्र येडे, नितीश बराटे,सुमित दिकोंडा, स्वप्नील राजवाडे, सायंदेव देहाडराय, सूचित देशपांडे यांच्यासह महिला मोर्चा प्रभारी व कोथरूडच्या सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, महिला मोर्चा अध्यक्ष कांचन कुंबरे, महिला मोर्चा सरचिटणीस विद्या टेमकर,पल्लवी गाडगीळ, सुप्रिया माझीरे, उपाध्यक्ष कल्याणी खर्डेकर, कविता सदाशिवे उपस्थित होते.

Dighi : एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचा समारोप; शेवटच्या दिवशी जनरल मनोज पांडे यांनी दिली भेट

उत्तरोत्तर रंगलेल्या या स्पर्धेस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. “कोथरूड श्री” हा मुख्य किताब वर्ल्ड जिमच्या गणेश बनकरने पटकवला तर मोस्ट इम्परुव्हडं बॉडी बिल्डरचा विजेता मोहम्मद एहराज ठरला, बेस्ट पोझरचा विजेता ठरला अतुल साळुंके तर अतिक शेखने अप कमिंग बॉडी बिल्डरचा ‘किताब पटकावला.

राजेंद्र नांगरे, नंदू कळमकर, मुस्तफा पटेल, दिलीप धुमाळ आणि सहकाऱ्यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा संयोजन प्रतीक खर्डेकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.