Dighi : एमएसएमई डिफेन्स एक्स्पोचा समारोप; शेवटच्या दिवशी जनरल मनोज पांडे यांनी दिली भेट

एमपीसी न्यूज – स्वदेशी संरक्षण उत्पादन आणि भविष्यातील (Dighi)संरक्षण तंत्रज्ञानातील देशाच्या क्षमतांचे दर्शन घडविणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या एमएसएमई डिफेन्स एक्स्पो 2024 चा सोमवारी (दि. 26) उदंड प्रतिसादात समारोप झाला. या एक्स्पोच्या निमित्ताने महाराष्ट्राने प्रथमच डिफेन्स एक्स्पोच्या आयोजनात पदार्पण केले. या तीन दिवसांच्या एक्स्पोला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र सरकार आणि मॅक्स एरोस्पेस अँड एव्हिएशन प्रा. लि., (Dighi)एसबीएल एनर्जी लि. आणि निबे लि. आणि मुनिशन्स इंडिया लि. यांच्यातील सहकार्याने सामंजस्य करार (एमओयू) हे या एक्स्पोचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य ठरले. या कार्यक्रमात संरक्षण उत्पादनातील स्वयंपूर्णतेच्या भारताच्या मार्गावरील आव्हाने आणि संधींसह संरक्षण परिसंस्थेच्या सद्य परिस्थितीवर प्रकाश टाकणारी तज्ज्ञांची चर्चासत्रेदेखील झाली.

 

या प्रदर्शनाला दोन लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली. संरक्षण उद्योगातील डीआरडीओ, एल अँड टी, भारत फोर्ज, निबे लि. सारख्या आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या संरक्षण उपकरणांचे प्रदर्शन येथे केले, ज्यामध्ये लहान शस्त्रास्त्र प्रणालीपासून विविध लष्करी वाहने आणि प्रगत हवाई-संरक्षण तंत्रज्ञान आणि क्षेपणास्त्र प्रणाली आदींचा समावेश होता.

प्रगत हलके हेलिकॉप्टर ध्रुव, वजनाला हलके लढाऊ हेलिकॉप्टर प्रचंड, शक्तिशाली धनुष तोफ, अचूक वेध घेणाऱ्या हॉवित्झर 77 बोफोर्स तोफा, टी-90 भीष्म आणि अर्जुन रणगाडे, बीएमपी-2 सारखी सैन्याच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी सुसज्ज वाहने यासह भारतीय वायुसेनेची मेक इन इंडिया निर्मित जमिनीवरून हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेणारी समर-2 आणि आकाश ही शस्त्रास्त्रे पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली.

पुण्यात आयोजित ‘डिफेन्स एक्स्पो’ला विद्यार्थी आणि नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद –

Pune : जलसंपदा विभागाच्या जागेवरील अनाधिकृत होर्डिंगला महानगरपालिकेचे अभय

एअर चीफ PVSM AVSM VM ADC मार्शल विवेक राम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेली संरक्षणदलाच्या प्रमुखांची आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची विद्यार्थ्यांबरोबर केलेली चर्चा या कार्यक्रमातील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम ठरला. या चर्चेसत्रात नौदल प्रमुख PVSM AVSM VSM ADC ॲडमिरल आर. हरी कुमार; लष्कर प्रमुख PVSM AVSM VSM ADC जनरल मनोज पांडे आणि भारतीय सशस्त्र दलाचे प्रमुख (CDS) PVSM UYSM AVSM SM VSM जनरल अनिल चौहान सहभागी झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संरक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि संधींबद्दल अतिशय उत्सुकतेने चर्चा केली. विद्यार्थ्यांशी सर्वांनी अत्यंत उत्साहाने संवाद साधला.

यावेळी ॲडमिरल आर. हरी कुमार म्हणाले, “आपण देशाच्या अमृत काळामध्ये मार्गक्रमणा करत आहोत. आपल्या देशाला 2047 पर्यंत पूर्ण विकसित देश बनविण्याचे उद्दिष्ट आहे. भारतीय नौदलाला खात्री आहे, की आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अनुषंगाने जहाजे, पाणबुड्या, विमाने आणि संरक्षणासाठी महत्त्वाची असलेली कोणतीही उपकरणे भारतात तयार केली जातील. एमएसएमई एक्स्पो हे सशस्त्र सेना आणि संरक्षण उद्योग यांच्यात समन्वय साधण्यासाठी आणि संवाद निर्माण करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. आयएनएस विक्रांतच्या निर्मितीत 500 एमएसएमईंचा सहभाग होता, त्या अनुभवावरून छोट्या उद्योगांना भेडसावणाऱ्या भांडवलाच्या आव्हानांना सामोरे जाण्याची गरज

आम्ही समजू शकतो आणि या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सिडबीसोबत काम करत आहोत. तसेच जसजसे आपण तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनत आहोत, तसतसा समुद्राद्वारे व्यापार वाढत आहे. भारतीय नौदल सुरक्षित, स्थिर प्रदेश निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. यामध्ये तांत्रिक प्रगती स्वीकारणे स्वदेशी उत्पादने आणि तंत्रज्ञानाकडे केंद्रित दृष्टीकोन निर्माण करणे अशा प्रकारे नौदलाकडून खरेदीदारांपासून नौदल उभारणीमध्ये यशस्वी परिवर्तन सुनिश्चित करणे आवश्यक आहे.”

जनरल मनोज पांडे म्हणाले, “पुणे हे नावीन्यपूर्ण संशोधन संस्था, स्टार्टअप्स, संशोधन केंद्रे आणि आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या उत्पादन क्षेत्रातील दीपस्तंभ आहे. हे शहर केवळ भारतासाठीच नव्हे तर जगभर नावीन्यपूर्ण उत्पादने, उपाय योजना आणि सेवांसाठी प्रसिद्ध आहे. आज देशाच्या प्रगतीच्या दृष्टीकोनाचा पाया शोधत आहोत. एक विकसित राष्ट्र म्हणून उदयास येण्याचा आपला संकल्प तरुणांची चिकाटी, विश्वास, कठोर परिश्रम आणि त्यागामुळे पूर्णत्वाला जाऊ शकतो. तरुणाई हीच आपल्या देशाच्या वाढीमागील प्रेरक शक्ती आहे. आम्ही स्टार्टअप्स, नवकल्पना आणि संशोधन यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक क्रांतीचे साक्षीदार आहोत. मी सर्व एमएसएमई आणि उद्योगातील प्रमुखांना खात्री देतो, की भारताची स्वदेशी संरक्षण क्षमता मजबूत करण्यासाठी भारतीय लष्कर त्यांच्याशी सहकार्य करण्यास वचनबद्ध आहे.”

डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत म्हणाले, “आपल्या पंतप्रधानांच्या स्वप्नातील प्रगत भारताच्या विकासात संरक्षण क्षेत्रातील प्रगती, आत्मनिर्भरता हे महत्त्वाचे घटक आहेत. वर्ष 2047 पर्यंत जागतिक स्तरावर नेतृत्व करण्यासाठी, आपण शैक्षणिक, एमएसएमई आणि स्टार्टअप उद्योगांना एकत्रित करणारी परिसंस्था विकसित केली पाहिजे.

 

या क्षेत्रातील ताज्या घडामोडी आणि तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे, आम्ही केवळ आमच्या सेवा वाढवण्याचेच नव्हे तर संरक्षण क्षेत्रात जगातील सर्वोत्तम देश बनविण्याचे ध्येय ठेवतो. एकत्रितपणे, आपण आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि 2047 पूर्वीच आपले ध्येय साध्य करू शकतो.”

या एक्स्पोचे नॉलेज पार्टनर निबे लि.चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे म्हणाले, “आम्हाला एमएसएमई डिफेन्स एक्स्पो 2024 सह भागीदारी केल्याचा अतिशय अभिमान आहे.

 

स्वदेशी संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानातील नवीनतम गोष्टींवर प्रकाश टाकणारा हा ऐतिहासिक उपक्रम आहे. हे पंतप्रधानांच्या मेक इन इंडिया उपक्रमाचे प्रतीक आहे. दारुगोळा, लढाऊ विमाने आणि पाणबुड्यांसह महत्त्वाच्या संरक्षण उपकरणेनिर्मितीमध्ये स्वयंपूर्णतेसाठी आपल्या देशाची बांधिलकी बळकट करण्यात या प्रदर्शनाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.