Pune: मोफत रुग्णवाहिका सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – स्वर्गीय खासदार गिरीशजी बापट यांच्या खासदार (Pune)विकास निधीतून वारजे कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवेचे उदघाटन शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, गिरीजा गिरीश बापट, माजी नगरसेविका वृषाली दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
कोरोना महामारीनंतर संपूर्ण जगाला अत्यावश्यक सेवा तसेच (Pune)रुग्णवाहिकांची गरज प्रकर्षाने भासली. हीच गरज ओळखून जनतेच्या सोयीसाठी व आपत्तीजनक प्रसंगात मदत व्हावी हा दृष्टिकोन ठेवत वारजे कर्वेनगर भागासाठी मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली.
या रुग्णवाहिकेला महानगरपालिकेच्या व्हेइकल डेपोच्या माध्यमातून २ ड्रायव्हर २४ तास उपलब्ध असल्याने, पुणे महानगरपालिका हद्दीमधील कोणत्याही ठिकाणी ही ॲम्बुलन्स सेवा मोफत दिली जाणार आहे. दिवंगत खासदार गिरीशजी बापट यांचे असणारे स्वप्न आज रुग्णवाहिकेच्या माध्यमातून पूर्ण झाले.
या कार्यक्रमाच्या वेळी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून कोथरूड तसेच खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये घेण्यात आलेल्या नमो चषक चित्रकला स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांचा बक्षीस समारंभ देखील पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवजी मुरकुटे, सचिनजी बारड यांनी केले. तसेच बापूसाहेब मेंगडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, माजी नगरसेवक सुशिलजी मेंगडे, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष  सचिनजी मोरे, गणेशजी वर्पे, माजी ज्येष्ठ नगरसेवक  शिवराम मेंगडे, माजी नगरसेवक किरण बारटक्के, स्वीकृत नगरसेवक बापूसाहेब मेंगडे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.