Pankaj Udhas : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे निधन

एमपीसी न्यूज : प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे आज निधन झाले. ते बरेच दिवस आजारी होते. ते 72 वर्षांचे होते. त्यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला.

पंकज उधास यांच्या पीआरने सांगितले की, 26 फेब्रुवारी रोजी ब्रीच कँडी रुग्णालयात सकाळी 11 वाजता त्यांचा मृत्यू झाला. ते बरेच दिवस आजारी होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे.

पंकज उधास आपल्या गझल गायकीमुळे घराघरात पोहचले. चिठ्ठी आई है या त्यांच्या गझलने त्यांनी चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. मुकरार, तरन्नम, मेहफिल ही त्यांची लोकप्रिय गाणी होती. 2006 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले. 1980 मध्ये आहत या त्यांच्या अल्बमने त्यांना यशाच्या शिखरावर नेले.

Pune : संविधान टिकवायचे असेल तर काँग्रेसला बळ द्या – डॉ सिध्दार्थ हत्तीअंबिरे

पंकजसारख्या गझल गायकाच्या जाण्याने चाहत्यांना दु:ख झाले आहे. सोशल (Pankaj Udhas) मीडियावर त्यांना चाहते अखेरची श्रद्धांजली वाहत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.