Tata Motors : टाटा मोटर्सच्या पिंपरी प्लांटमध्ये राम पूजन आणि आरती सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज – अयोध्या येथे श्री रामलल्लाच्या मूर्तीची सोमवारी (दि. 22) प्राणप्रतिष्ठा (Tata Motors) झाली. त्यानिमित्त टाटा मोटर्सच्या पिंपरी प्लांट मध्ये श्रीराम पूजन आणि आरती सोहळा संपन्न झाला.

प्लांट हेड सुनील तिवारी यांच्या हस्ते पूजा आणि आरती करण्यात आली. आरए लाईन टीएमडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

Lonavala : कार्ला येथील वॅक्स म्युझियममध्ये मनोज जरांगे यांचा मेणाचा पुतळा

टीएमडी आरए लाईनच्या कामगारांच्या वतीने प्लांट हेड सुनील तिवारी यांना पुष्पगुच्छ व अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देऊन सन्मानित करण्यात आले. टीएमडी विभाग प्रमुख प्रसाद फुलगिरकर, टीएमडी मधील नवनिर्वाचित युनियन प्रतिनिधी शिशुपाल तोमर, शशिकांत कात्रे यांनाही पुष्पगुच्छ व अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सोहळा संपन्न होण्यासाठी विभाग प्रमुख प्रसाद फुलगीरकर, आरएएलसीएक्स ओनर प्रशांत कुमावत, मेन्टेनन्सचे राजू घाडगे यांनी सहकार्य केले. विजय चौधरी, राहुल शिंदे, श्रीकांत कुलकर्णी, गजानन कळसकर, महेश माने, कमलाकर बेलकर, दादासाहेब शिंदे, संतोष ढवळे, सुरेंद्र नरवडे, तानाजी शिंदे, लक्ष्मण शिंदे, ट्रेनी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न (Tata Motors) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.