Pimpri : दारिद्र्य व कुपोषणाच्या दुष्टचक्रातून मातांना बाहेर काढणाऱ्या समिना शेख यांना टाटा मोटर्सतर्फे कौतुकाची थाप

एमपीसी न्यूज – शहरे विकतीस होत असली तरी शहरातील ( Pimpri) बकाली, रोगराई व काही भागात असलेले मागासपण हे दुर्लक्षीत करून चालत नाही. त्याचाच एक भाग म्हणजे झोपडपट्टी भागात होणारी लहान मुलांची उपासमारी व त्यातून येणारे कुपोषण. अशा या गंभीर समस्यांच्या मुळाशी जाऊन काम करणाऱ्या व परिवर्तन घडवून आणण्यासाठी धडपडणाऱ्या दुतांना टाटा मोटर्स हे त्यांच्या सीएसआरद्वारे नेहमीच मदत करत असते. अशीच कौतुकाची थाप कुपोषीत बालकांच्या आईसाठी झगडणाऱ्या समिना शेख यांना टाटा मोटर्सने दिली आहे.

पुण्‍यातील मोठ्या प्रमाणात वंचित व्‍यक्‍ती राहणाऱ्या झोपडपट्ट्यांमध्‍ये 2014 पासून बाल कुपोषण व दारिद्र्यते विरोधातील मूक संघर्ष सुरू आहे. यात बदल घडवा यासाठी टाटा मोटर्स जमेल तसा त्यांच्या वतीने प्रयत्न करत असून वेगवगेळे उफक्रम देखील यासाठी राबवले जात आहेत. समाजातील सर्वात वंचित व्‍यक्‍तींना सक्षम करण्‍याचे, तसेच त्‍यांना बाल कुपोषणाविरोधात शाश्‍वत पद्धतीने लढण्‍यास मदत करण्‍याचे मिशन आहे. या उपक्रमामधील उल्‍लेखनीय कम्‍युनिटी लिंक वर्कर (सीएलडब्‍ल्‍यू) समीना शेख या आशेचा किरण ठरल्‍या आहेत.

त्‍यांनी कुपोषित मुलांच्‍या मातांना गरिबी व कुपोषणाच्‍या दुष्‍टचक्रामधून बाहेर पडण्‍यास मदत करण्‍यासाठी सक्षम करण्‍याची गरज ओळखली. समीना यांनी कुटुंबांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले.

Pimpri : शहरात आणखी पाणी कपात होणार? व्हायरल मेसेजवर अधिकारी म्हणतात…!

सर्व कुपोषित मुलांच्‍या मातांना एकत्रीत करत समीना यांचा या उपक्रमाच्‍या दिशेने प्रवास सुरू झाला. केवळ कुपोषण दूर करायचे नाही तर त्याची मुळंच छाटून टाकण्याचा हा निर्धार होता. यासाठी त्यांनी लघु उद्योगांसाठी महिलांमधील क्षमतांना पाहून त्‍यांचा प्रवास सुरू केला. समीना यांनी काळजीपूर्वक त्‍यांची कागदपत्रे गोळा केली, नोकरीसाठी येणाऱ्या अडथळ्यांना दूर केले आणि त्‍यांचे अर्ज भरले. यामध्‍ये त्‍यांना घवघवीत यश मिळाले. जवळपास 30 पात्र महिलांना त्‍यांचे घरगुती व्‍यवसाय सुरू करण्‍यासाठी जवळपास प्रत्‍येकी 10 हजार रूपयांचे आर्थिक साह्य मिळाले.

या परिवर्तनात्‍मक उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करत टाटा मोटर्सची सीएसआर प्रमुख विनोद कुलकर्णी म्‍हणाले की, समीना शेख यांची समर्पितता आणि या उपक्रमाच्‍या यशामधून सक्षमीकरणाची परिवर्तनात्‍मक क्षमता दिसून येते. टाटा मोटर्समध्‍ये आमचा आमच्या सीएसआर उपक्रमांच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍ती व समुदायांवर सखोल व दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्‍यावर विश्‍वास आहे. समीना यांच्‍या कार्यामधून समाजात स्थिरता, स्‍वावलंबीपणा व सकारात्‍मक परिवर्तन घडवून आणण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.

या सक्षम लाभार्थी आता बांगड्यांची दुकाने, मासे विक्रेते, भाजीपाला विक्रेते व फुलांची दुकाने असे लघुस्‍तरीय उद्योग सुरू करण्‍यास सुसज्‍ज आहेत. या आर्थिक सक्षमीकरणामुळे या कुटुंबांना दारिद्र्यामधून बाहेर पडण्‍यासह स्थिर करत कुपोषणाविरोधात लढण्‍यास मदत झाली आहे. आज आमच्‍या प्रकल्‍पांतर्गत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील 96 टक्‍क्‍यांहून अधिक कुपोषित मुले स्वस्थ झाली आहेत, ज्‍यांच्‍यामध्‍ये उत्तम स्किल्‍स व उल्‍लेखनीय आकलन क्षमता दिसून येत आहे. हे शेख यांचे व पर्यायाने टाटा मोटर्सचे मोठे यश आहे.

यांसारख्‍या उपक्रमांच्‍या माध्‍यमातून टाटा मोटर्स त्यांचे सामाजिक भान जपत आहे. कारण एका वेळी एका सक्षम व्‍यक्‍तीसह समाजात परिवर्तन घडू शकते या विचाराने टाटा मोटर्स त्यांचे कर्तव्य पार पाडत ( Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.