Chinchwad : भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम – किसनमहाराज चौधरी

एमपीसी न्यूज – अंतर्मनातील भावनांचे विरेचन करण्यासाठी कविता हे उत्तम माध्यम ( Chinchwad ) आहे, असे विचार ज्येष्ठ प्रवचनकार किसनमहाराज चौधरी यांनी मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर प्रांगण, चिंचवडगाव येथे  व्यक्त केले.

कवयित्री मानसी चिटणीस लिखित ‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना किसनमहाराज चौधरी बोलत होते.  किशोर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक अरविंद दोडे, शोभा जोशी, कवयित्री मानसी चिटणीस यांची व्यासपीठावर; तसेच ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, नीलेश शेंबेकर, अभिजित काळे, हेमंत जोशी, स्मिता कुलकर्णी यांची सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती.

Tata Motors : टाटा मोटर्सच्या पिंपरी प्लांटमध्ये राम पूजन आणि आरती सोहळा संपन्न

ह. भ. प. किसनमहाराज चौधरी पुढे म्हणाले की, “मानसी चिटणीस यांच्या कविता अंतर्मुख करणाऱ्या आहेत. काव्यातील अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या गुणांचे ओतप्रोत दर्शन ‘माझ्यातील बुद्धाचा शोध’ या कवितासंग्रहातून घडते.

शांतीचा शोध घेताना कवयित्रीने प्रतिमा अन् प्रतीकांचा चपखल वापर केला आहे!” अरविंद दोडे यांनी, “सहस्त्र पाकळ्यांचे कमळ म्हणजे भगवान बुद्ध होय. माणसाला शांती, समाधान आणि सुख याची अभिलाषा असते; आणि प्रत्येकाच्या मनात एक बुद्ध दडलेला असतो. त्याचा शोध घेतल्यास माणसाची अपेक्षापूर्ती होते!” असे मत ( Chinchwad ) मांडले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.