Pimpri : टाटा कंपनीतील कामगारांचे संघटन विलक्षण – सुहास बहुलकर

'कलासागर दिवाळी अंक 2023' प्रकाशन समारंभ उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – पूर्वीची टेल्को आणि आताची टाटा असलेल्या कंपनीचे ( Pimpri ) लहानपणापासून आदराने नाव ऐकत आहे. मी पहिल्यांदाच कंपनीत आलो आणि मला विलक्षण अनुभव आला. कामगारांची अशी संघटना मला दुसरीकडे कुठेही बघायला मिळाली नाही, असे मत प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी व्यक्त केले.

टाटा मोटर्सच्या ‘कलासागर’ या 43 व्या दिवाळी अंकाचे प्रकाशन प्रसिद्ध चित्रकार सुहास बहुलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमासाठी प्लांट हेड (सीव्हीबीयु) सुनील तिवारी, कार प्लांटचे एचआर प्रमुख विवेक बिंद्रा, टाटा मोटर्स कलासागरचे अध्यक्ष सुनील सवाई, कामगार युनियनचे अध्यक्ष सचिन लांडगे, सरसचिव संतोष दळवी, कार्याध्यक्ष अशोक माने, कलासागरचे सहसचिव रोहित सरोज, साहित्यिक विभागाचे सचिव मकरंद गांगल, एम्प्लॉई रिलेशन प्रमुख संतोष बडे आदी मंचावर उपस्थित होते.

अनेक विषयांवर बोलताना बहुलकर यांनी जीवनातल्या पहिल्या चित्राचा अनुभव, आचार्य अत्रे यांनी दिलेली कौतुकाची थाप, इंदिरा गांधी यांचे चित्र काढताना झालेली गोची अशा अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.

ते म्हणाले, “मी जे आर डी यांची दोन पोर्ट्रेट चित्रे काढली. जे आर डी यांची चित्रे काढल्याचा मनस्वी आनंद आहे. विविध गुण असलेल्या लोकांना एकत्र घेऊन कंपनी आपली यशस्वी वाटचाल करत असते. टाटा कंपनीने हे सूत्र जपले आहे.

Ravet : उत्पादन शुल्क विभागाने रावेतमध्ये पकडले पाऊण कोटीचे विदेशी मद्य; 74 लाखांची विदेशी दारू जप्त

प्रत्येकाला कलेसाठी वाहून घेता येत नाही. चरितार्थासाठी वेगळं शिक्षण घ्यावं लागतं ( Pimpri ) आणि कलेसाठी आपली वेगळी ओढ असते. कलेतून निरपेक्ष आनंद मिळतो. त्यामुळे त्यातून चरितार्थ साधता येत नाही, असेही बहुलकर यांनी सांगितले.

प्लांट हेड सुनील तिवारी म्हणाले, “टाटा मोटर्स सिस्टम बनवत नाही. तर टाटा मोटर्स लोकांना तयार करते आणि हेच लोक पुढे जाऊन सिस्टम बनवतात. संस्कृतीचे जतन करणे हे कलासगरचे उद्दिष्ट आहे. कला आपल्याला जगण्याचे भान देते.”

1972 मध्ये कलासागरची सुरुवात झाली. कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना कंपनीसोबत जोडून ठेवण्याचे काम कलासागर करत असल्याचे गौरवोद्गार अध्यक्षीय भाषणात सुनील सवई यांनी काढले. सुनील सवई म्हणाले, “कलासागरने अनेक दिग्गज कलाकार निर्माण केले. कामगारांना त्यांच्या अंगी असलेल्या कला जोपासण्यासाठी हा उत्तम मंच आहे. कामगारांच्या सर्वांगीण विकासातून गुणवत्ता वाढीसाठी कलासागर नेहमी कार्यरत आहे.

48 व्या कथा कविता स्पर्धेचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात आले. त्यात इंग्रजी लेख – शार्दुल महामुनी, इंग्रजी कविता – चिन्मयी रहाणे, अथर्व नाईक, संस्कृती कदम, प्राची शहा, हिंदी कविता – ऋचा मोहबे, अनिता पालपवार, मौनी बिसेन, रेश्मा घोरपडे, हिंदी कथा – ऋचा मोहबे, मधूलिका सिंह, विष्णू नाईक, विशेष लेखन – आरती येवले, शीतल परब, सिया सामंत, भीमराज अकोलकर, रशिदा शेख, कमल सोनजे,

कस्तुरी पोतदार, समीर मंडपे, सुनीता पाटील, राजेश हजारे, अनघा काशीकर, मुंजाजी कोरडे, शिवाजी आंधळे, रेखा मोळे, दत्तात्रय अवसरकर, योगेश सोनवणे, ज्येष्ठा माने, सरदार मोळे, स्मिता नाईक, बाल लेखक – विठ्ठल खबाले, अथर्व नाईक, चिन्मयी रहाणे, आरोही विभूते,

ज्येष्ठा माने, मराठी लेख व ललित लेखन – मानसी चिटणीस, सीमा गांधी, पूजा सामंत, रमजान शेख, संदेश थोरवे, राजेश चौधरी, मराठी कविता – प्रांजल बारी, कांचन नेवे, रेणुका हजारे, केशर भुजबळ, मानसी चिटणीस, सीमा गांधी, राजगोंडा पाटील, मराठी कथा – शीतल माने, मैत्रेयी कातरकी, अनिता उन्हाळे, एकनाथ पाटील, लक्ष्मण कुमावत, केतकी मंडपे यांना बक्षीस मिळाले.

अंबादास कहाणे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. सुनील सवाई, संतोष दळवी, श्याम सिंग, सुनील तिवारी आदींनी मनोगत व्यक्त केले. स्मिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. मयुरेश कुलकर्णी यांनी आभार ( Pimpri ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.