Congress : युवक काँग्रेसचे गौरव चौधरी यांची नॅशनल मीडिया पॅनलिस्ट पदी निवड

एमपीसी न्यूज – भारतीय युवक काँग्रेसच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्ट (राष्ट्रीय प्रवक्ता ) पदी चिंचवडमधील ( Congress) काँग्रेसचे कार्यकर्ते गौरव चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच यंग इंडिया के बोल सीजन 4 साठी गोवा राज्याच्या प्रभारीपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय युवा काँग्रेस कडून ‘यंग इंडिया के बोल’ हा उपक्रम जिल्हा, राज्य ,राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येतो. यामधून पक्ष संघटनेसाठी विविध पातळीवर प्रवक्ता नेमण्याचे उद्देश असते. यामध्ये विशेष प्राविण्य मिळवत सखोल अभ्यास, उत्कृष्ट वकृत्व यामुळे जिल्हा व राज्य स्तरावर गौरव चौधरी हा प्रथम आला.

बेंगलोर येथे झालेल्या युवक काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशनात अतिशय चांगले आणि प्रभावीपणे आपले मुद्दे ठेवित भाषण केले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर चांगल्या पद्धतीने केल्याने  भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास यांच्याकडून गौरव यांची भारतीय युवक काँग्रेसच्या नॅशनल मीडिया पॅनलिस्ट (राष्ट्रीय प्रवक्ता )पदी निवड केली.

World Cup 2023 : भारतीय संघाने रचला धावांचा डोंगर, श्रीलंकेपुढे 358 धावांचे लक्ष्य!

चौधरी हे पिंपरी-चिंचवड शहर युवक काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिवयासोबत याआधी त्यांनी पिंपरी-चिंचवड युवक काँग्रेस महासचिव, प्रवक्ता अशा अनेक पदांवर काम केले आहे.

गौरव चौधरी यांचे  बी फार्मसी,एमबीए, पत्रकारिता, एम ए राज्यशास्त्र शिक्षण झाले आहे. ते उच्चशिक्षित असून कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य कुटुंबातून प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण कामातून त्यांची राष्ट्रीय प्रवक्तेपदी निवड झाली आहे.  शहरातील राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांचे आभार मानतो.  चांगल्या पद्धतीचे काम करेन असे चौधरी यांनी निवडीनंतर ( Congress) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.