Chinchwad : मराठा समाजाने केलेल्या जाळपोळीच्या निषेधार्थ तैलिक महासभेचे तहसिलदारांना निवेदन

एमपीसी न्यूज – आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण (Chinchwad) लागले. त्यावेळी मराठा समाजाने काही लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने हवेलीच्या तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा शहर जिल्हा अध्यक्ष अनिल राऊत, खानदेश तेली समाज अध्यक्ष अनिल चौधरी, खानदेश तेली समाज महिला मंच माजी अध्यक्षा शैला चौधरी, सुनंदा चौधरी, भरत चौधरी, रमेश चौधरी आदी उपस्थित होते.

तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आंदोलकांकडून राज्यात ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली. याची झळ तैलिक समाजाच्या नेत्यांना बसली आहे.

Congress : युवक काँग्रेसचे गौरव चौधरी यांची नॅशनल मीडिया पॅनलिस्ट पदी निवड

समाजाचे नेते जयदत्त क्षीरसागर, युवा आघाडी अध्यक्ष संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थान आणि पाच वाहनांना आंदोलकांनी आग लाऊन मोठे नुकसान केले आहे. आमदार प्रकाश सोळंके, प्रशांत बंब, कुंडलिक खाडे यासह अल्पसंख्यांक व मागासवर्गाच्या समाजाला देखील मराठा समाजाच्या आंदोलकांनी वेठीस धरले.

मराठा आरक्षणाला ओबीसी, अल्पसंख्यांक, मागासवर्ग समाजाने पाठींबा दर्शवला आहे. ज्या समाजाच्या नेत्यांनी आरक्षणाला विरोध केला त्यांच्या विरोधात आंदोलन करायला हवे. जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील निवेदनात करण्यात आली (Chinchwad) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.