Ravet : उत्पादन शुल्क विभागाने रावेतमध्ये पकडले पाऊण कोटीचे विदेशी मद्य; 74 लाखांची विदेशी दारू जप्त

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Ravet ) पुणे-बंगळूरू महामार्गावर रावेत येथे मोठी कारवाई केली आहे. विदेशी मद्य घेऊन जाणारा ट्रक पकडून त्यातून तब्बल 74 लाख 56 हजार रुपये किमतीच्या 44 हजार विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

विजय चंद्रकांत चव्हाण (वय 53, रा. सातारा), सचिन निवास धोत्रे (वय 31, रा. सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पुणे-बंगळूरू महामार्गावरून एक विदेशी मद्याचा ट्रक जाणार असल्याची राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रावेत येथे एमएच 15/एफव्ही 7940 हा ट्रक अडवला. ट्रकची झडती घेतली असता त्यामध्ये दारूच्या बाटल्या ठेवलेल्या 80 गोण्या आढळल्या.

रॉयल ब्ल्यू व्हिस्की, आईस मॅजिक ऑरेंज वोडका आणि रॉयल ब्लंट माल्ट व्हिस्की अशा वेगवेगळ्या कंपनीच्या 44 हजार (Ravet ) बाटल्या उत्पादन शुल्क विभागाने जप्त केल्या.

PCMC : अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली कचरा स्थानांतर केंद्राची पाहणी

ट्रक आणि विदेशी मद्य असा एकूण एक कोटी 19 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 74 लाख 56 हजार रुपयांची केवळ बनावट दारू आहे. आरोपींना अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.