PCMC : अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केली कचरा स्थानांतर केंद्राची पाहणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे  ( PCMC ) अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी  कासारवाडी आणि गवळीमाथा येथील कचरा स्थानांतर केंद्र तसेच भोसरी तलावाचे पुनरुज्जीवन व सुशोभिकरण या कामांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि कामे जलदगतीने करावीत असे निर्देशही संबंधितांना दिले.

Maratha Reservation : मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण सुटले; सरकारला शेवटची वेळ तर शिष्टमंडळाला यश

कासारवाडी आणि गवळीमाथा येथील प्रकल्पांना भेट दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन सी ए पी) अंतर्गत कासारवाडी आणि गवळीमाथा येथील घरघुती घातक कचरा प्रक्रियेसाठी उभारण्यात येत असलेल्या प्रक्रिया केंद्र आणि अमृत 2.0 या उपक्रमातंर्गत अंतर्गत भोसरी मैलाशुध्दीकरण केंद्र बांधणीचा आढावा घेतला तसेच तेथील बांधकाम प्रक्रियेची माहिती घेतली.

या पाहणी दरम्यान त्यांच्या सोबत सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, क्षेत्रीय अधिकारी आण्णा बोदडे, उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता अनिल भालसाखळे, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे तसेच उपअभियंता योगेश आल्हाट उपस्थित होते.

त्यानंतर अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी चिखली तसेच जाधववाडी येथील मैलाशुद्धीकरण केंद्रास भेट दिली. तसेच चिंचवड येथील मैलाशुध्दीकरण केंद्राच्या पाहणी दौऱ्यावेळी तेथील स्काडा तंत्रज्ञानाबाबतची माहिती घेतली.

या पाहणी दौऱ्यादरम्यान सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता हरविंदरसिंग बन्सल, उपअभियंता सोहन निकम, राजेंद्र मोराणकर ( PCMC ) उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.