Pune : 40 टक्के कर सवलती करता पीटी 3 अर्ज भरण्याची मुदत वाढवा : दिपाली धुमाळ

एमपीसी न्यूज – 40 टक्के कर सवलती करता पीटी 3 अर्ज (Pune)भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी पुणे महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ यांनी केली आहे. त्यासंबंधीचे निवेदन महापालिका आयुक्त यांना आज देण्यात आले आहे.

पुणे शहरातील 3 लाख मिळकतीची सवलत मागील(Pune) वर्षी चुकीच्या सर्वेने काढून घेण्यात आली होती. प्रशासनाद्वारे ही सवलत पुन्हा कायम करण्यात आली. ज्यादा आलेली रक्कम काढून टाकण्यासाठी पीटी 3 फॉर्म अर्ज भरण्यासाठी दिनांक 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली गेली होती. सध्याची परिस्थिती अशी आहे की आतापर्यंत 2 लाख नागरीकांनी या फार्मचे अर्ज केले आहेत.

Talwade : ज्येष्ठ नागरिकाच्या तोंडाला मिरची पावडर फासून 27 लाखांची चोरी करणाऱ्या पाच आरोपींना अटक

परंतु, अजूनही 1 लाख मिळकतदारांचे अर्ज भरायचे बाकी आहे. या शिल्लक राहिलेल्या नागरिकांना पीटी 3 फार्म अर्ज करण्यासाठी दिलेल्या वेळेत मुदतवाढ करण्यात यावे, असेही दिपाली धुमाळ यांनी म्हटले आहे. उपायुक्त कर आकारणी व कर संकलन विभाग यांनाही यासंबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.