Namdev Jadhav : नामदेव जाधव शाईफेक प्रकरणी 15 जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – शरद पवार यांच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने ( Namdev Jadhav ) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नामदेव जाधव यांच्यावर शनिवारी (दि. 18) शाईफेक केली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दहा ते 15 अज्ञात इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव निवृत्ती जाधव (रा. प्राधिकरण, निगडी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, नामदेव जाधव यांचा पुण्यातील भांडारकर इंस्टीट्युट येथे कार्यक्रम होता. तो नियोजित कार्यक्रम रद्द झाला. त्याबाबत माहिती देण्यासाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास नामदेव जाधव हे नवी पेठ येथील पत्रकार भवनात आले होते.

ते पत्रकारांशी बोलत असताना अचानकपणे आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या विरुद्ध भूमिका घेतली म्हणून, ‘यापुढे शरद पवार यांच्या विरुद्ध वक्तव्य कराल तर तुम्ही या जगात दिसणार नाही’ अशी धमकी देत तोंडावर व अंगावर काळी शाई लावली.

Google doodle : विश्वचषक क्रिकेट सामन्यानिमित्त गुगलचे विशेष डूडल

नामदेव जाधव यांच्यासोबत असलेले पोलीस अंगरक्षक अक्षय कांबळे हे सरकारी कर्तव्य करीत असताना त्यांनाही धक्काबुक्की करून बाजूला ढकलून कार्यकर्त्यांनी नामदेव यांच्या तोंडाला काळे फासले.

घटनेची माहिती मिळताच पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी धमकी देणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, धक्काबुक्की केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रामबाग पोलीस तपास करीत ( Namdev Jadhav ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.