Pune : रिक्षा प्रवासात तरुणाचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज – रिक्षातून प्रवास करणाऱ्या तरुणाचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री दहा वाजताच्या सुमारास पेरणे फाटा(Pune) येथे घडली.

याप्रकरणी 18 वर्षीय तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास रिक्षातून घरी जात होता. रिक्षातील एका प्रवाशाला उतरण्यासाठी रिक्षा पेरणे फाटा येथे थांबली असता रिक्षाच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी तरुणाच्या हातातील 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. लोणीकंद पोलीस तपास(Pune) करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.