Lonikand : तरुणीला ऑनलाईन बुकींग करणे पडले महागात, बँक खात्यातून तीन लाख रुपयांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – पर्यटनासाठी निघालेल्या तरुणीला(Lonikand)ऑनलाइन हॉटेल बुकिंग करणे महागात पडले. सायबर चोरट्यांनी तरुणीच्या बँक खात्यातून तीन लाख पाच हजार रुपयांची रोकड चोरुन नेली.

याबाबत एका तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand)फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणी उच्चशिक्षित आहे. ती नोकरीनिमित्त वाघोली परिसरात स्थायिक झाली आहे.

Talewade : तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रुग्ण महिलेचे निधन; मृतांची संख्या 12

नाताळात तिला महाबळेश्वरला जायचे होते. त्यामुळे तरुणीने ऑनलाइन पद्धतीने हॉटेलमधील खोली आरक्षित करण्याचे ठरवले होते.

तरुणीने महाबळेश्वरमधील हॉटेलची माहिती घेण्यास सुरुवात केली. तिने महाबळेश्वरमधील द कीज हॉटेलमधील खोली आरक्षित करण्याचे ठरविले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरुणीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. हॉटेलमधील कर्मचारी असल्याची बतावणी करुन चोरट्याने तरुणीच्या बँक खात्याची माहिती घेतली. तरुणीच्या खात्यातून परस्पर तीन लाख पाच हजार रुपये चोरले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.