Pune : हुडहुडी वाढली, पुण्याचा पारा 12 अंशावर

एमपीसी न्यूज – अरबी समुद्रातील चक्राकार (Pune)वाऱ्यांची स्थिती निवळून गेली असून, नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात विषुववृत्ताजवळ चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी दाट धुके आणि गारठा वाढला आहे.

सकाळी तसेच संध्याकाळनंतर हवेत थंडावा वाढला आहे.पुणे जिल्ह्याचे तापमान देखील घसरले असून सरासरी किमान तापमान हे 12 अंशावर आले आहे.

पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (दि.15) सर्वाधिक कमी किमान (Pune)तापमान पाषाण येथे 11 अंश सेल्सिअस तर सर्वात जास्त किमान तापमान वडगाव शेरी येथे 19.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. पुढील चार दिवस तरी जिल्ह्यात सकाळी धुके आणि आकाश मुख्यत- ढगाळ राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्याच्या दक्षिणेच्या भागात काही ठिकाणी अंशत- आकाश ढगाळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Lonikand : तरुणीला ऑनलाईन बुकींग करणे पडले महागात, बँक खात्यातून तीन लाख रुपयांची रोकड लंपास

शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअस) –

– शिवाजीनगर – 12.3

– पाषाण – 11.0

– लोहगाव – 15.1

– मगरपट्टा – 18.5

– कोरेगाव पार्क – 16.8

– बारामती – 12.2

– दौंड – 15.5

– वडगाव शेरी – 19.2

– खेड – 16.4

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.