Pimpri : पवना धरणात जूनअखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा, वाढीव पाणीकपात नाही

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणार्‍या(Pimpri) मावळ तालुक्यातील पवना धरणात 82 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा जून 2024 अखेरपर्यंत पुरणार आहे. त्यामुळे शहराला पाण्याबाबत फारशी चिंता करण्याची गरज नाही. वाढीव पाणी कपात केली जाणार नाही.

 

एक दिवसाआडच पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याचे महापालिका पाणीपुरवठा विभागाने सांगितले.

शहरासाठी पवना धरणातून दररोज 510 एमएलडी पाणी(Pimpri ) रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातून उचलले जाते. त्या पाण्यावर निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते संपूर्ण शहराला पुरविले जाते. महापालिकेची पुरवठा व्यवस्था पुरेशी नसल्याने शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज पाणी देण्याबाबत राजकीय पक्षांसह विविध संघटनांनी वेळोवेळी मागणी केली आहे.

Talegaon Dabhade:परिक्रमा कथक डान्स स्कूलची दशकपूर्ती निमित्त नृत्यप्रेमीं साठी नृत्याविषकारांची परवणी

मात्र, दोन दिवसातून एकदा पाणी दिले जात आहे. हा पाणीपुरवठा दोन दिवस पुरेल इतका असतो. संपूर्ण शहराला समन्यायिक पाणी मिळावे म्हणून हे धोरण स्वीकारल्याचे महापालिकेचे मत आहे. शहराच्या दोन भागांमध्ये विभागून हे दिवसाआड पाणी दिले जाते.

पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर दररोज पाणी देण्याची मागणी वाढली होती. मात्र, महापालिका आपल्या धोरणावर ठाम राहत दिवसाआड पाणी देत आहे. सध्या धरणात 82 टक्के पाणीसाठा आहे. हा साठा शहराला जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेल इतका आहे. तसेच, आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीच्या निघोजे बंधार्‍यात 75 एमएलडी पाणी चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नेले जात आहे. तेथे ते शुद्ध करून परिसराला दिले जात आहे. तसेच, एमआयडीसीकडून 20 एमएलडी शुद्ध पाणी महापालिका घेत आहे. शहराला दररोज 605 एमएलडी पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, काही सखल भागांमध्ये योग्य दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी कायम आहेत.

पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, पवना धरणात पुरेसा पाणीसाठा आहे. जून 2024 पर्यंत पुरेल इतके पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे शहराला आता सुरू असलेला पाणीपुरवठा कायम राहणार आहे. जलसंपदा विभागाकडून सूचना आल्यास आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.