Talegaon Dabhade: परिक्रमा कथक डान्स स्कूलच्या दशकपूर्तीनिमित्त नृत्यप्रेमींसाठी नृत्याविष्कारांची पर्वणी

एमपीसी न्यूज – मानसी दांडेकर संचालित (Talegaon Dabhade) परिक्रमा कथक डान्स स्कूल या नृत्य वर्गाच्या तळेगाव शाखेने यंदा कारकिर्दीची 10 वर्षे पूर्ण केली आहेत.

तसेच कथक नृत्याच्या क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गुरू पंडिता रोहिणी भाटे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. या दोन्हीचे औचित्य साधून मानसी दांडेकर व त्यांच्या विद्यार्थिनी ‘दशकपूर्ती’ हा छोटेखानी कार्यक्रम सादर करणार आहेत.

Alandi : रविवारी आळंदीतून निघणार इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा

हा कार्यक्रम गुरूवार दि. 28 डिसेंबर 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता कलापिनी सांस्कृतिक केंद्र,तळेगाव दाभाडे येथे आयोजित केला असून येथे प्रवेश विनामूल्य असणार आहे.

या कार्यक्रमात रसिकांना वंदना, पारंपरिक ताल प्रस्तुती बरोबरच (Talegaon Dabhade) केशवसुतांची 150 वर्षे जुनी कविता, स्त्रीशक्तीला आवाहन करणारा गोंधळ, आणि इंडियन ओशन या अल्बममधील एक अतिशय वेगळ्या पद्धतीची रचना अशा काही प्रयोगात्मक रचनांची प्रस्तुती देखील बघायला मिळणार आहे. यामध्ये तळेगाव व पुणे शाखांमधील विद्यार्थिनी व मानसी दांडेकर नृत्य प्रस्तुती करणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.