Pune : पुणे पुस्तक महोत्सवाचे आज उद्घाटन ; दोन लाख पुस्तकं पाहण्याची आणि खरेदीची पुणेकरांना संधी

एमपीसी न्यूज -राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) पुणे पुस्तक (Pune )महोत्सवाचे उद्घाटन आज, (16डिसेंबर) फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी चार वाजता होणार आहे.

या महोत्सवात नागरिकांना 250पुस्तकांच्या स्टॉल्समधून 15 पेक्षा अधिक भाषांमधील दोन लाख पुस्तके पाहण्याची आणि विकत घेण्याची संधी मिळणार आहे.

या महोत्सवात विविध राज्यांतील (Pune )खाद्यसंस्कृतीची चव चाखण्याची संधीही नागरिकांना मिळणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे .

Pimpri : तळवडे दुर्घटनेनंतर आता राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण

महोत्सवात भव्य पुस्तक प्रदर्शनासह वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे. सायंकाळी गायक नंदेश उमप यांचा ‘लोकरंग’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी सात वाजता होणार आहे .

त्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्वाक्षरी असलेली देशाच्या संविधानाची प्रत, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचे हस्तलिखित, भगतसिंग यांचे हस्तलिखितही पुणेकरांना या महोत्सवात पाहता येणार आहे.

या महोत्सवाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण विभाग यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील २५० विविध संस्थांनी पाठिंबा दिला आहे.

महोत्सवात 15  भारतीय भाषांतील पुस्तकांची दोनशेहून अधिक दालने असणार आहेत. पुस्तक प्रदर्शनाबरोबरच विविध सांस्कृतिक कार्यक्रम, चर्चासत्रे, साहित्यिकांच्या मुलाखती, सृजनशीलतेला वाव देणारे आणि वाचन संस्कृतीचा विकास घडविणारे कार्यक्रम फर्ग्युसन महाविद्यालयातील खुला रंगमंच आणि अॅम्फी थिएटर येथे होणार आहेत. हा महोत्सव 24डिसेंबरपर्यंत  सुरू राहणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.