Alandi : रविवारी आळंदीतून निघणार इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळा

एमपीसी न्यूज – आळंदी येथून इंद्रायणी माता परिक्रमा (Alandi )पालखी सोहळा हा दि.17 रोजी टाळमृदंगाच्या हरिनामाच्या गजरात (पायी दिंडीत) निघणार आहे.

या उपक्रमातून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्ती प्रबोधन कीर्तनाच्या माध्यमातून केले जाणार असून विविध धार्मिक ,सामाजिक स्वच्छता अभियान व (आजानवृक्ष)वृक्षारोपण इ.कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्याचे येत्या 17 डिसेंबर ते 28 डिसेंबर या कालावधीत आयोजन केले आहे.व या सोहळ्याचे आळंदीतील ह भ प गजानन महाराज लाहुडकर यांनी आयोजन केले आहे.

Pimpri : तळवडे दुर्घटनेनंतर आता राज्यातील सर्व महापालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण

सोहळ्यात निवृत्तीमहाराज संस्थान अध्यक्ष (Alandi) नीलेश गाढवे पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांनचे विश्वस्त योगी निरंजननाथ, संत सोपानदेव मंदिर संस्थान अध्यक्ष त्रिगुण महाराज गोसावी, संत मुक्ताबाई संस्थान अध्यक्ष रवींद्र पाटील, संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, आमदार दिलीप मोहिते, आमदार महेश लांडगे, आमदार सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत.

इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात पालखीत श्रींचे पादुका, ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी, गाथा असतील.इंद्रायणी नदी तीरावर कुरवंडे ,देहू आळंदी,तुळापूर यासह अनेक गावे वाड्या वस्त्या मध्ये प्रवेश केला जाणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.