Talegaon : सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची प्रकट मुलाखत

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील कलापिनी या संस्थेचा 47 वा वर्धापन दिन शनिवार (दि. 4 मे) रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांची प्रकट मुलाखत(Talegaon) होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी दिले आहे.

 

मुक्ता, एक होता विदुषक, सिंहासन, जैत रे जैत असे एकाहून एक गाजलेले चित्रपट, तुझे आहे तुजपाशी, वेड्याचे घर उन्हात, घाशीराम कोतवाल यांसारख्या नाटकातून अभिनेते म्हणून रसिकप्रिय असे जब्बार पटेल(Talegaon) यांना प्रकट मुलाखतीमधून ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

 

वर्धापन दिनानिमित्त कलापिनी पुरस्कारांच्या सोहळ्याचे वितरण होणार आहे. यानिमित्त चेतन शहा, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे यांना कलापिनीतील विशेष योगदानाबद्दल गौरविण्यात येणार आहे. 4 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता कलापिनी सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रम होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.