Today’s Horoscope 16 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज – आजचे पंचांग -Today’s Horoscope 16 December 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – शनिवार.

तारीख 16.12.2023

शुभाशुभ विचार- 9 प. चांगला दिवस.

आज विशेष – विनायक चतुर्थी.

राहू काळ – सकाळी9.30 ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – श्रवण.

चंद्र राशी – मकर.
—————————–
मेष – ( शुभ रंग – पिस्ता )
रिकाम टेकडी चर्चा टाळून फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. अधिकारी वर्गास वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. मित्र आज तुम्हाला चुकीचे सल्ले देतील.

वृषभ ( शुभ रंग- हिरवा)
ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील. आज तुमचा अध्यात्माकडे कल राहील. घरात देवकार्य करण्याचे बेत आखाल. घरातील मोठ्यांचा मान राखावा लागेल.

मिथुन – ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज आपल्या कुवती बाहेर कोणतीच रिस्क घेऊ नका. हातचे सोडून पळत्या मागे धावायचा मोह टाळा. आज सासुरवाडी कडून तुम्हाला लाभ संभवतो. पत्नीच्या हो ला हो करून विषय संपवा.

कर्क – ( शुभ रंग – राखाडी)
व्यवसायात भागीदारांशी एकमत राहील. आज वैवाहिक जीवनातही गोडी गुलाबी असेल. आपल्या जोडीदाराचे हट्ट पुरवण्याचा आज तुम्ही मनापासून प्रयत्न कराल. इतरांना योग्य सल्ले द्याल.

सिंह -( शुभ रंग – निळा)
नोकरदारांना कामाचे तास वाढवावे लागतील. कोणतीही गोष्ट सहज साध्य नसली तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळेल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.

कन्या – ( शुभ रंग- डाळिंबी)
नोकरदारांना त्याच त्याच कामाचा कंटाळा येईल. आज तुमचा मौज मजा करण्याचा मूड असेल. सहकुटुंब चैन कराल. प्रेम प्रकरणांना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील.

तूळ ( शुभ रंग- भगवा)
आज तुम्ही प्रत्यक्ष कृतीपेक्षा चर्चेतच जास्त रमाल. कुठेही न जाता आज घरीच आराम करण्याचा तुमचा मूड असेल. गृहिणींचे गृह उद्योग आज तेजीत चालतील.

वृश्चिक ( शुभ रंग – क्रीम)
आज घराबाहेर वावरताना डोके थंड व वाणित गोडवा असू द्या. काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील. मोफत सल्लागार मंडळींच्या हो ला हो करा आणि वादविवाद टाळा.

धनु (शुभ रंग- पांढरा)
व्यापार उद्योगात मिळकत मनाजोगती असेल. बंद पडलेले उपक्रम नव्याने सुरू करता येतील. आप्तस्वकीय तुमच्या शब्दाला मान देतील. गोड बोलून इतरांची मने जिंकाल.

मकर- ( शुभ रंग – आकाशी)
आज तुम्ही काहीसे लहरीपणाने वागाल. तुमच्याकडून काही आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. कुणालाही मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)
आज कुठेही आपलेच खरे करण्याचा प्रयत्न करू नका. महत्त्वाच्या चर्चेत आपले मत मांडण्याची घाई करू नका. दानधर्म करतानाही आधी आपली शिल्लक तपासून घ्या.

मीन ( शुभ रंग- मोरपंखी)
कार्यक्षेत्रात तुमच्या पूर्वीच्या कष्टांचे चीज होईल. यश तर आता अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. जसे चिंताल तसे होईल, त्यामुळे आज फक्त शुभच चिंता.

 

श्री जयंत कुळकर्णी.
ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.
फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.