Talewade : तळवडे आग दुर्घटनेतील जखमी रुग्ण महिलेचे निधन; मृतांची संख्या 12

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड परिसरातील (Talewade)तळवडे येथील कारखान्यात झालेल्या आग दुर्घटनेतील जखमी रुग्ण सुमन गोधडे (वय 40 वर्षे) यांचे रात्री दोन वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले.

तळवडे येथील एका कारखान्यामध्ये 8 डिसेंबर (Talewade )रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत 6 जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर, 10 जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी तातडीने पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

त्यातील प्रतिक्षा तोरणे (वय 16 वर्षे) आणि कविता राठोड (वय 45 वर्षे) यांचे 9 डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय 31 वर्षे) यांचे 10 डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.

Pune : पुणे पुस्तक महोत्सवाचे आज उद्घाटन ; दोन लाख पुस्तकं पाहण्याची आणि खरेदीची पुणेकरांना संधी

तर प्रियंका यादव (वय 32 वर्षे) आणि अपेक्षा तोरणे (वय 18 वर्षे) यांचे 14 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले. आज आणखी एक जखमी महिलेचे निधन झाल्याने तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या 12 इतकी झाली आहे.

या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.