Pune : शरद मोहोळ खून प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ

एमपीसी न्यूज –  शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ( Pune)  न्यायालयाने पुणे पोलिसांना 30  दिवसांची मुदतवाढ दिली आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची मुदत मिळावी, यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता.

पाच जानेवारीला शरद मोहोळ याचा कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या प्रकरणी 16  जणांना अटक करण्यात आली  असून त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Today’s Horoscope 31 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे असून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले,ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत.

सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत ( Pune) आहेत.यातील गणेश मारणे वगळता इतर 15 आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी 90 दिवसांची वाढ मिळाली यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने पुणे पोलिसांना दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी 30 दिवसांची मुदतवाढ दिली आली आहे.उर्वरित 60 दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांच्यावतीने मोक्का विशेष न्यायालयात  अर्ज करण्यात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे करत ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.