Pune : माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते म्हणून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खूनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज –  माहेरच्यांकडे जास्त लक्ष देते म्हणून विवाहितेचा पतीने गळा आवळून खून (Pune) करण्याचा प्रयत्न केला आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.5) बावधन (Pune) येथे घडली आहे.

याप्रकरणी पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून श्रीरंग पांडूरंग कापसे ( रा.बावधन) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्यावर संशय  घेऊन तू जास्त तुझ्या माहेरच्यांकडेच लक्ष देते म्हणत आरोपीने पीडितेचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळला.तसेच पीडितेच्या छातीवर पाय ठेवून पीडिता तडफडत असताना ही गळा आवळण्याचा प्रयत्न केला. पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेत जीव वाचवला. यावरून हिंजवडी पोलिसांनी  आरोपी ( श्रीरंग पांडूरंग कापसे )  विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.