BJP : भारतीय जनता पार्टीचा 44 वा वर्धापन दिन साजरा

एमपीसी न्यूज –  भारतीय जनता पार्टीचा 44 वा वर्धापन दिन आज शनिवारी (दि.6) रोजी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यालय मोरवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी, आमदार अश्विनी जगताप (BJP), उमा खापरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा देण्यात आल्या.

पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस विलास मडेगिरी, नामदेव ढाके, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस शीतल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, माजी नगरसेवक माऊली थोरात, केशव घोळवे, अनुराधा गोरखे, युवा मोर्चा प्रदेश तेजस्विनी कदम, ज्येष्ठ कार्यकर्ता संयोजक नंदू कदम, नंदू भोगले, महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली खाड्ये, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका प्रीती कामतीकर, उपाध्यक्ष आशा काळे, चिटणीस राजश्री जायभाय, चिटणीस गिता महेंद्रु, महेश बारसावडे, विशाल वाळुंजकर, गणेश लंगोटे, विजय शिनकर, रवी देशपांडे, भूषण जोशी, जयदीप खापरे, कैलास सानप, डॉ. तृप्ती परदेशी, शोभा भराडे, राधिका बोर्लीकर, सतीश नागरगोजे, संदेश गादिया, देवदत्त लांडे, संतोष टोनगे, मुकेश चुडासमा, सुरेश गादिया, सीमा चव्हाण, अश्विनी कांबळे, संजय परळीकर यांच्यासह जिल्हा पदाधिकारी,मोर्चा/ आघाडी/प्रचार  प्रमुख, मंडल पदाधिकारी,विधानसभा वॉरियर्स, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

PCMC : महापालिका रूग्णालयांची होणार स्पर्धा

याप्रसंगी, जिल्हा पदाधिकारी (BJP) यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना पक्षाच्या  आत्तापर्यंत  44  वर्षाचा लेखाजोखा मांडला. आज भारतीय जनता पक्ष हा एकनिष्ठ कार्य केलेल्या  कार्यकर्त्यांमुळे  संपूर्ण जगात एक नंबर आहे. आजचे हे वैभव आपल्याल्या जे पाहायला मिळत आहे. ते फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे, म्हणून भाजपा हा  कार्यकर्त्यांचा पक्ष असून, केंद्रात नरेंद्र मोदी (BJP) यांचे सरकार  तिसऱ्यांदा  सत्तेत  आणायचे असून त्यासाठी सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरात   भारतीय  जनत  पक्षवाढीसाठी कार्य केलेल्या जेष्ठ  कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा निहाय 8 मंडलामध्ये प्रत्येक बुथवर  ध्वजारोहण  करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.