PCMC : महापालिका रूग्णालयांची होणार स्पर्धा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांतील (PCMC)रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी  वैद्यकीय विभागाच्या वतीने एक स्पर्धा घेण्यात येणार आहे. उत्कृष्ट रुग्णसेवा देणारी रुग्णालये व दवाखान्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

महापालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय, नवीन थेरगाव,(PCMC) नवीन भोसरी, आकुर्डी, नवीन जिजामाता, चिंचवडमधील नवीन तालेरा, मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालय, सांगवी, यमुनानगर अशी एकूण 9 मोठी रुग्णालये आहेत. तर, शहरात विविध ठिकाणी 34 दवाखाने आहेत. रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा मिळावी, यासह वैद्यकीय विभाग अधिक सक्षम करण्यात येत आहे. त्यासाठी डॉक्टर परिचारिका व कर्मचाऱ्यांना विविध प्रकाराचे प्रशिक्षण दिले जात आहे.

रुग्णालये व दवाखान्यात किती रुग्ण उपचार घेतात, विविध शस्त्रक्रिया तसेच, महिला प्रसुतीचे प्रमाण किती आहे, किती रुग्ण दगावले, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे रुग्णालय व दवाखान्यांबाबत काय मत आहे, आदींसह विविध घटकांची सर्वेक्षण करून पाहणी केली जाणार आहे.

रुग्णालये व दवाखान्यांची वर्षभराची कामगिरी तपासली जाणार आहे. सर्वोत्कृष्ट रुग्णालय व दवाखान्यांचा सन्मान केला जाणार आहे. ही स्पर्धा दरवर्षी घेतली जाणार या स्पर्धेला या वर्षापासून सुरूवात केली जाणार असल्याचे डॉ. गोफणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.