Pune : पुणे शहर काँग्रेस मध्ये अंतर्गत नाराजी नाट्य संपेना

एमपीसी न्यूज -पुणे शहर काँग्रेस मध्ये फ्लेक्सवर फोटो  (Pune)लावला नाही या कारणावरून थेट मंडपवाल्याला मारहाण करण्यात आली आहे.

पुणे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या(Pune) बैठकीसाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर “नेत्याचा” फोटो टाकला नाही म्हणून मारहाण करण्यात आली.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीत हा प्रकार घडला आहे. बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर काँग्रेसचे एक नेते आणि माजी राज्यमंत्री यांचा फोटो नव्हता.

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील-देवेंद्र फडणवीस

फोटो नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मेळावा सुरू होण्यापूर्वीच संबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी मंडपवाल्याला जाब विचारत त्याला मारहाण केली आहे. काल केसरीवाडा येथे देखील काँग्रेस मधील नाराजी आणि अंतर्गत वाद समोरआले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.