Chikhali: कुदळवाडी परिसरात अनधिकृत भंगार दुकानांना भिषण आग, 100 पेक्षा जास्त दुकाने जळून खाक, अद्याप कुलींगचे काम सुरु

एमपीसी न्यूज – चिखली,कुदळवाडी व जाधववाडी परिसरातील अनधिकृत भंगार दुकानांना (Chikhali)आज (शनिवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग एवढी भयंकर होती की या आगीत 100 पेक्षा जास्त दुकाने जळून खाक झाल्याचा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे. ही आग आज सकाळी सहा च्या सुमारास अटोक्यात आणली असून अद्यापही कुलींग चे काम सुरु आहे.सुदैवाने यात कोणती ही जीवीत हानी झालेली नाही.

अग्निशमन दलाचे उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांनी एमपीसी न्यूज (Chikhali)शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, आगीचे अद्याप कारण कळू शकलेले नाही. दुकाने एकदम चिकटून असल्याने तेथे प्लास्टीक, रबर काच, कागद असे सामान असल्याने अगीने काही काळात च  रौद्र रुप धारण केले. आगीचे गांभिर्य ओळखून पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या एकूण 12 गाड्या, पुणे महापालिकेची 1, चाकण नगर परिषद ची एक, चाकण एमआयडीसी ची एक, चिंचवड एमआयडीसी ची एक व टॅंकर अशा 15 ते 16 गाड्या घंटनास्थळी दाखल होत्या. यावेळी 70 ते 72 गाडी पाणी येथे आग विझवण्यासाठी लागले. तर सुमारे 70 ते 80 जवान कर्तव्यावर हजर होते.

गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांची घेतली मदत


आग अटोक्यात येण्यासाठी पाच ते सहा तास लागले. येथ सात ते आठ एकर चा परिसर या आगीने बाधीत झाला आहे. आगीचे लोट पाहून नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली होती. दीड ते दोन हजार नागरिक तेथे जमा झाले होते.  त्यांचा आग विझवण्यात अडथळा येत होता. शेवटी त्यांना नमियंत्रणात अनण्यासाठी स्थानिक पोलिसांचा फौजफाटा मागवावा लागला.

Nigdi: मतदार जागृती साठी निगडीतील तीन युवक करणार निगडी ते श्रीशैलम असा 800 किलोमीटरचा सायकल प्रवास

व्यावसायीकांनी सुरक्षे संदर्भात ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक –

चिखली-कुदळवाडी, जाधववाडी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून भंगार सामानाची गोदाम आहेत. त्यातील 90 टक्के गोदामे ही अनधिकृत आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेने वेळोवेळी संबंधीत व्यावसयिकांवर कारवाई केली आहे. तरी देखील व्यावसायीक महापालिकेच्या किंवा अग्निशमन दलाच्या नोटीसींना प्रतिसाद देत नाहीत,ना हरकत प्रमाणपत्र घेत नाहीत, योग्य त्या उपाययोजनांची पुर्तता केली जात नाही, येथे कोणतीही आग विझवण्याची यंत्रणा नाही .

आसपास शाळा व रहिवासी परिसर आहे त्यामुळे हा शहरातला अत्यंत धोकादायक व संवेदनशिल परिसर बनत आहे.आगीत ज्यांची दुकाने जळाली त्यांची नावे कळू शकलेली नाहीत मात्र त्यांनी त्वरीत सर्व कागदपत्रे व सुरक्षा व्यवस्थांची पुर्तता करावी असे आवाहन अग्निशमन दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.