Nigdi: मतदार जागृती साठी निगडीतील तीन युवक करणार निगडी ते श्रीशैलम असा 800 किलोमीटरचा सायकल प्रवास

एमपीसी न्यूज –  मतदार जागृती साठी निगडीतील तीन युवक करणार निगडी ते श्रीशैलम(Nigdi) असा 800 किलोमीटरचा सायकल प्रवास करणार आहेत. मतदानासंदर्भात मतदार जागृती मोहिमे अंतर्गत इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे निगडी भक्ती शक्ती ते श्रीशैलम आंध्र प्रदेश अशी सुमारे 800 किलोमीटरची सायकल मोहीम अंतर्गत श्रेयस पाटील रमेश माने आणि सुनील चव्हाण यातील धुरंदर सायकल पटूंनी आज (दि.6)  निगडी येथील भक्ती शक्ती येथून प्रस्थान केले.

मोहिमेअंतर्गत ते विविध संस्थांना तसेच कॉलेजेसला भेट देणार आहेत आणि मतदान करण्यासंदर्भात (Nigdi)जनजागृती करणार आहेत असे इंडो अथलेटिक्स सोसायटीचे सदस्य गजानन खैरे यांचा तर्फे सांगण्यात आले, याप्रसंगी गणेश भुजबळ पाटील, अजित पाटील, अमित पवार, अजित गोरे, संतोषजी नखाते, गिरीराज उमरीकर उपस्थित होते.

Alandi: केळगाव येथील मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण;आळंदी शहराला आज होणार पाणीपुरवठा
त्यांचा पुढील प्रवास खालील प्रमाणे राहणार आहे.

दिवस 1- निगडी ते मोहोळ 237 किमी

दिवस 2- मोहोळ ते गाणगापूर 135 किमी

दिवस 3 – गाणगापूर ते गंडेड  160 किमी

दिवस 4 –  गंडेड ते मनानुर 145 किमी

दिवस 5 – मनानुर ते श्रीशैलम 75 किमी

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.