Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील-देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज -कल्याणच्या जागेवरून अनेक दिवसांपासून महायुतीत (Shrikant Shinde)धुसफूस चालू होती. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितला होता. या मुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र असूनही विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नव्हती.

आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याणच्या जागेवर (Shrikant Shinde)श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील,अशी घोषणा केली आहे.

ठाणे, कल्याणच्या भाजपच्या नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. या नेत्यांनी आपली नाराजी फडणवीस यांच्याकडे बोलून  दाखवली होती. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी दिल्यास आम्ही त्यांच्या प्रचाराचे काम करणार नाही, असा निर्णय भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थकांनी घेतला होता. त्यानंतर आता फडणवीस यांनीच श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.

Alandi: केळगाव येथील मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण;आळंदी शहराला आज होणार पाणीपुरवठा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, श्रीकांत शिंदे यांना भारतीय जनता पक्षाकडून विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पक्ष त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने त्यांचा प्रचार करणार आहोत.आम्ही महायुतीतील सर्व घटकपक्ष श्रीकांत शिंदे  यांना निवडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणे नंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात लढत होणार आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.