Alandi: केळगाव येथील मुख्य जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम पूर्ण;आळंदी शहराला आज होणार पाणीपुरवठा

आळंदी शहराची भामा आसखेड वरून(Alandi) येणारी मुख्य जलवाहिनी शुक्रवारी दि .5 रोजी दुपारी 4.00 वाजेच्या दरम्यान केळगाव येथे दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात लिकेज झाल्याने शहराचा पाणीपुरवठा दुपारी गावठाणातल्या दोन टप्प्यानंतर बंद करण्यात आला होता. लिकेजचे काम शनिवार दि. 6 रोजी पहाटे 4.15 पर्यंत पूर्ण करण्यात आले.

पहाटे 4.30 पासून जलटाक्या भरण्याचे काम सुरू आहे. जलटाक्या (Alandi)भरल्या नंतर आळंदी शहरात पाणीपुरवठा आज होणार आहे.सकाळी 11 वा. ते 11:30 दरम्यान शहरातील राहिलेल्या गावठाण (खेड  विभाग)टप्प्यांना (टप्प्यानुसार) पाणी वितरण होणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागा मार्फत देण्यात आली.

Indapur: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखांची भेट

गुरुवार दि. 4 रोजी पुणे महानरपालिकेने नियमित देखभाल   दुरुस्तीकरिता एक दिवसाकरिता  पाणीपुरवठा  बंद  घोषित केला होता.यामुळे गुरुवारी कुरुळी येथील जलशुद्धीकरण केंद्र येथे दुरुस्तीचे काम पालिकेचे कर्मचारी करत होते.

त्यानंतर ते  आळंदी जल शुद्धीकरण कार्यरत होते.व त्यामध्ये काल दु. 4  वा.आळंदी शहराची भामा आसखेड वरून येणारी मुख्य जलवाहिनी केळगाव येथे दोन ठिकाणी मोठ्या प्रमाणात लीकेज झाली.तिचे काम पहाटे सव्वाचार च्या सुमारास पूर्ण होईपर्यंत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तिथे कार्यरत होते.तसेच शहरात पाणीपुरवठा  व्हावा यासाठी सद्यस्थितीत जलशुध्दीकरण केंद्र व शहरातील जलटाक्यांच्या येथे ते कार्यरत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.