Indapur: देवेंद्र फडणवीस यांनी घेतली सुप्रिया सुळेंच्या प्रचार प्रमुखांची भेट

एमपीसी न्यूज -राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे जिल्हा परिषद(Indapur) सदस्य प्रविण माने यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे.

प्रविण माने हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या इंदापूर तालुका प्रचार समितीचे प्रमुख (Indapur)आहेत.त्यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चां सुरु झाल्या आहे.

PCMC : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

देवेंद्र फडणवीस इंदापूरच्या दौऱ्यावर असून इंदापुरात भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे इंदापुरात भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या सर्व कार्यकर्त्यांची आज कार्यकर्ता मेळाव्यातून नाराजी दूर केली जाणार आहे.

इंदापूर येथे आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण माने यांची भेट घेतली आहे. फडणवीस यांनी प्रविण माने यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. या भेटीमुळे प्रविण माने अजित पवार गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चां सुरु झाल्या आहेत.

प्रविण माने गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत होते.

प्रविण माने यांच्या भेटीवर फडणवीस म्हणाले, “प्रविण माने दादांशी माझे खूप जुने संबंध आहेत. वैयक्तिक संबंध आहेत. ते अनेकवेळा माझ्या घरी येतात. ते बऱ्याच दिवसांपासून माझ्या मागे लागले होते की, इंदापुरात तुम्ही येता पण माझ्याकडे येत नाहीत. त्यामुळे मी कबूल केलं होती की, मी तुमच्याकडे चहा प्यायला येईल. त्यामुळे मी त्यांच्याकडे चहा प्यायला गेलो होतो. ते आमच्यासोबतच आहेत. आमचे जुने सहकारी आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.