Pune : तू सर्वात चांगली सून आहेस. ; माजी खासदार नानासाहेब नवले यांनी केली सुनेत्रा पवार यांची प्रशंसा

एमपीसी न्यूज – बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या ( Pune) उमेदवार सुनेत्रा पवार या रविवारी मुळशी तालुक्यातील प्रचार दौऱ्यात होत्या. या दौऱ्यात ताथवडे येथेही त्यांनी भेट दिली. सुनेत्रा पवार ताथवडे येथे येणार म्हणून माजी खासदार विदुरा तथा नानासाहेब नवले हेही त्यांच्या ताथवडेतील निवासस्थानी आले होते. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी त्यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांनी घरात पाऊल टाकताच नानासाहेब नवले म्हणाले “यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ” माजी खासदार नानासाहेब नवले यांच्या या म्हणण्याला नेमकी पार्श्वभूमी कोणती? हे ओळखून उपस्थित सर्वांनीच आनंद व्यक्त केला. तर सुनेत्रा पवार यांनी मात्र नानासाहेब नवले यांना नमस्कार करून त्या काॅंप्लिमेंटचा विनम्रपणे निशब्दपणे स्वीकार केला.

 

शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी “बाहेरची” असे संबोधून सून सुनेत्रा पवार यांना परके ठरवले होते. त्यावरून मोठी खळबळ देखील उडाली होती. या वक्तव्यावर मोठी टीकाही झाल्याने पवार यांना कधी नव्हे तो खुलासा करून आपण तसे बोललो नाही, आपला उद्देश तसा नव्हता. आपल्या म्हणण्याचा गैर अर्थ काढला असे सांगून स्वतःच्या कृत्याचे खापर माध्यमांवर फोडले होते.

 

Pune : परदेशात पाठविलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज आढळल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी केली महिलेची 19 लाख रुपयांची फसवणूक

 

या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचेच एकेकाळचे सहकारी आणि काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी घरी जाऊन ज्यांची भेट घेतली होती त्या माजी खासदार विदूरा उर्फ नाना नवले यांनी, सुनेत्रा पवार यांना, “तू सर्वात बेस्ट सून आहेस”, असे प्रशस्तीपत्रक दिले. एवढेच नाही तर खूप आग्रह करून दोन घास तरी खाल्लेच पाहिजेत, असे सांगून जेवण करायला लावले.

काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनीही नानासाहेब नवले यांची त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी आपला पाठिंबा सुनेत्रा पवार यांना दिला होता. आता शाब्बास सूनबाई म्हणत सर्वात सरस सून असल्याचे दिलेले प्रशस्तीपत्र महत्वाची घटना मानली जात आहे.

दरम्यान, नानासाहेब नवले यांची नातसून जान्हवी सूमेश नवले यांनी नुकतेच यूपीएसीमध्ये यश प्राप्त केले. त्याबद्दल सुनेत्रा पवार यांनी जान्हवी यांचे कौतुक करत नवले कुटुंबीयांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन ( Pune) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.