PCMC : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज – आंद्रा धरणातून गेल्या पाच दिवसांपासून पाणी कमी झाल्यामुळे (PCMC )समाविष्ट गावासह उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. असे असताना  पाणी पुरवठा विभागाच्या 70 पेक्षा जास्त कर्मचा-यांना लाेकसभा निवडणुकीचे कामकाज देण्यात आले आहे.  पुरवठा विभागाचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने नागरिकांच्या घशाला काेरड पडण्याची वेळ आली आहे.

इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधा-याला गळती लागली असून आंद्रा धरणातून मिळणा-या (PCMC )पाण्यात घट झाली आहे. पाच दिवसांपासून फक्त 21 एमएलडी पाणी शहरासाठी मिळात आहे. त्यामुळे 60 एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावांसह उपनगरांमध्ये पाणी समस्या गंभीर झाली आहे. वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, च-होली, मोशी, डुडुळगावातील पाणी समस्या गंभीर झाली आहे.

LokSabha Elections 2024 :निवडणूक प्रचारासाठी समाजमाध्यमांच्या वापरावर निवडणूक प्रशासनाचे लक्ष!

पाच दिवसांपासून आंद्रा धरणातून 21 एमएलडीच पाणी मिळत आहे. त्यामुळे मोठी तूट झाली. ही तूट भरुन काढण्यासाठी पालिकेने पवना धरणातून दहा एमएलडी अधिकचे पाणी उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरात विविध भागात पाण्याची बाेंब असताना पाणी पुरवठा विभागामधील 200 कर्मचा-यांपैकी 70 पेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामात गुंतले आहेत. त्यामुळे इतर कर्मचा-यांवर ताण येत असल्याचे चित्र आहे.   दरम्यान, अपु-या पाणी पुरवठ्या संदर्भात एका दिवसाला 30 तक्रारी पालिकेकडे येत आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी निवडणूक कामकाजासाठी घेण्यात येत नाही. मात्र, सुरूवातीला काही कर्मचा-यांची नियुक्ती केली हाेती. जिल्हाधिका-यांनी दिलेल्या सुचनेनुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना निवडणुकीच्या कामकाजातून वगळ्याची सूचना सहायक निवडणूक निर्णय अधिका-यांना दिली आहे. त्यांच्या जागी राखीव कर्मचा-यांची नियुक्ती केली जाणार आहे, असे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जाेशी यांनी सांगितले.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.