Alandi: माऊली मंदिरा मध्ये पापमोचनी एकादशी निमित्त भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज -आज दि.5 रोजी आळंदी  येथे पापमोचनी एकादशी निमित्त (Alandi)संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठया प्रमाणात गर्दी होती.

 

एकादशी निमित्त माऊलींच्या मंदिराच्या गाभाऱ्या मध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

 

मंदिरात भाविकांसाठी उपवासाच्या (पदार्थाचे ) महाप्रसादाचे (Alandi)आयोजन करण्यात आले होते. एकादशी निमित्त प्रदक्षिणा रस्त्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली च्या जयघोषात काही वारकरी भाविकांच्या दिंड्या  प्रदक्षिणा पूर्ण करताना दिसत होत्या.

Alandi: प्लास्टिक पिशव्यांचा वापर करू नये याकरिता पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांकडून जनजागृती

 

तसेच इंद्रायणी काठी भाविकांची गर्दी दिसून येत होती.वारकरी संप्रदायासाठी असणारे ग्रंथ, साहित्य , वस्तूंच्या व हार फुलांच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी फुलेली  होती.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.