Today’s Horoscope 06 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 06 April 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – शनिवार.

तारीख -06.04.2024.

शुभाशुभ विचार – 10 पर्यंत चांगला दिवस.

आज विशेष – शनि प्रदोष.

राहू काळ – सकाळी 09.00ते 10.30.

दिशा शूल – पूर्वेला असेल.

आज नक्षत्र – शततारका 15.40 पर्यंत नंतर पूर्वा भाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ.
—————————–
मेष- ( शुभ रंग- आकाशी)
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभाचा असून तुमची काही विसरलेली येणी ही आकस्मिक रित्या वसूल होतील. गैरसमजामुळे दुरावलेली काही नाती ही जवळ येतील.

वृषभ (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
आज नोकरदारांच्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. नवीन व्यावसायिकांना यशाची चाहूल लागेल. आज चुकीचा मार्ग दाखवणारे काही मित्र भेटतील. सतर्क रहा.

मिथुन (शुभ रंग – निळा)
उद्योग व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करावाच लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांना गुड मॉर्निंग करणे हिताचे राहील. नामस्मरणात खंड नकोच.

कर्क ( शुभ रंग- पिस्ता)
नोकरदारांना वरिष्ठांच्या दडपणात काम करावे लागेल. कायदा मोडण्याचा विचारही मनात आणू नका. आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. कोणतेही धाडस नकोच.

सिंह ( शुभ रंग- केशरी)
कौटुंबिक सदस्यांमध्ये सामंजस्य राहील. आज घरात काही प्रिय पाहुण्यांचे आगमन संभवते. संध्याकाळी लवकर घर गाठा. पत्नी आतुरतेने वाट पाहत असेल.

कन्या (शुभ रंग- डाळिंबी)
कार्यक्षेत्रातील वाढत्या कामाचा प्रकृतीवर ताण पडेल. वाढत्या महत्त्वाकांक्षांना थोडासा ब्रेक लावून तब्येतीकडे लक्ष देणे ही गरजेचे आहे. नोकरांचे फार लाड नकोत.

तूळ (शुभ रंग- क्रीम)
उच्च शिक्षण घेणाऱ्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढतील. प्रेम प्रकरणांना थोरामोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. आज खाण्यापिण्यावर ताबा ठेवा. संध्याकाळी पोट बिघडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक ( शुभ रंग- सोनेरी)
आज तुमच्यासाठी अनुकूल दिवस असून सर्व महत्त्वाची कामे दिवसाच्या पूर्वर्धात उरकून घ्या. आज काही प्रिय मित्र-मैत्रिणींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

धनु (शुभ रंग- भगवा)
आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेरच जाईल. लेखक व कवी मंडळींना आज नवीन कल्पना सुचतील. व्यवसायात जाहिरातींचे सातत्य वाढवावे लागेल.

मकर (शुभ रंग- पांढरा)
राशीच्या धनस्थानी भ्रमण करणारा चंद्र आर्थिक बाजू भक्कम ठेवणार आहे. गृहिणींना काटकसर करण्याची अजिबात गरज नाही. बोलताना मात्र शब्द जपून वापरा.

कुंभ ( शुभ रंग- जांभळा)
उद्योग धंद्यात तुमचा प्रगती रथ वेगाने घोडदौड करेल. आज काही सज्जन मंडळींच्या सहवासात तुमचे विचार प्रगल्भ होतील. जोडीदाराला दिलेला शब्द पाळाल.

मीन (शुभ रंग- राखाडी)
आज कंजूष वृत्तीला लगाम घालून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागतील. काही जणांना तातडीने दूरच्या प्रवासाला निघावे लागू शकते. आज तुमचा अध्यात्माकडे कल राहील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.