Mahalunge : रिक्षाचालकाला मालकाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षा भाडेतत्त्वावर शिफ्टमध्ये चालवण्यासाठी दिलेली असताना चालकाला रिक्षा मालकाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी चालकाने मालकाच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना शनिवारी (दि. 13) डोंगरवस्ती, निघोजे येथे घडली.

अभिषेक कैलास पन्हाळे (वय 23, मूळ रा. यवतमाळ) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित संजय राठोड (रा. डोंगरवस्ती, निघोजे, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Dehuroad : पैशांच्या वादातून चुलत्यास मारहाण; दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी अजित याने त्याची रिक्षा (एमएच 12/क्यूएल 2822) फिर्यादी पन्हाळे(Mahalunge) यांना शिफ्टमध्ये  चालवण्यासाठी दिली आहे. दरम्यान, ती रिक्षा पन्हाळे यांचा मित्र लखन उर्फ कल्लेश्वर बब्रुवान वाचने याने त्याच्या मूळ गावी धाराशिव येथे नेली. ती रिक्षा शोधून दे नाहीतर तिचे पैसे दे असे म्हणत आरोपीने पन्हाळे यांच्याकडे पैशांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर तर तुला घराबाहेर जाऊ देणार नाही, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच पन्हाळे यांना घराबाहेर जाऊ न देता प्रतिबंध केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.