Express Way Accident : पुणे-मुंबई दृतगती मार्गावर दुधाचा टँकर उलटला; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

एमपीसी न्यूज – पुण्याहून मुंबईकडे जाणारा दुधाचा टँकर खंडाळा (Express Way Accident) घाटात उलटला. या टँकरची एका कार आणि कंटेनरला धडक बसली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी (दि. 25) सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास घडला.

पृथ्वीराज यादव (वय 40, रा. उत्तर प्रदेश) असे मृत्यू झालेल्या टँकर चालकाचे नाव आहे. संकेत अतुल अग्रवाल (वय 29), प्रतीक अतुल अग्रवाल (वय 34, दोघे रा. खराडी पुणे), रितेश चांगदेव जगदाळे (वय 32, रा. माण, सातारा) अशी जखमींची नावे आहेत.

Ravet : रावेत मधून अडीच लाखांचे एमडी ड्रग्स जप्त

मिळालेल्या माहितीनुसार, दुधाचा टँकर (जीजे 18/बीव्ही 5559) चालक यादव हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. खंडाळा घाटात आल्यानंतर त्याचे टँकरवरील नियंत्रण सुटले आणि टँकर पलटी झाला. हा टँकर एका कार (एमएच 14/व्हीक्यू 1072) वर आदळला. तसेच पुढे एका कंटेनर (एमएच 46/डीबी 9309)ला धडकला.

या अपघातात कारमधील संकेत आणि प्रतीक हे दोघे जखमी झाले आहेत. टँकरची कंटेनरला धडक बसल्यानंतर कंटेनर देखील उलटला. यामध्ये कंटेनर चालक रितेश जगदाळे देखील जखमी झाले आहेत. तर टँकर चालक पृथ्वीराज यादव याचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी (Express Way Accident) झाली. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस, आयआरबी पथक, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, आरटीओ, महाराष्ट्र सुरक्षा बल, मृत्युंजय देवदूत आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद खोपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

https://www.youtube.com/watch?v=lST7LUQdN7g

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.