Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कार सुरक्षा रेलिंगला धडकून झालेल्या अपघातात पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज दि.(21एप्रिल) पहाटे 02.50 वाजण्याच्या सुमारास  चालक सुरज रामचंद्र चौगुले (वय – 55 वर्ष, पोलीस उप निरीक्षक, पार्क साईट पोलीस ठाणे, मुंबई) यांचे कारवरील नियंत्रण सुटून कार पहिल्या लेनच्या रेलिंगला जोरात धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला.

कार चालक सुरज रामचंद्र चौगुले हे ईर्टीगा कारने  (गाडी क्र-MH 43 CG 8988) हे मुंबईच्या दिशेने जात होते तेव्हा हा अपघात झाला.

Nigdi : भिंतीला धडकल्याने कार पेटली 

त्यांच्या वाहनाचा(Expressway) धक्का एवढा जोरदार होता की कार अक्षरशः रेलिंगमध्ये घुसली त्यामुळे गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला.

आय.आर.बी. पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य ॲम्बुलन्स, महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा पळस्पे यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत मदतकार्य केले. एका पोलीस अधिकाऱ्याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदरचा अपघात हा पनवेल (Expressway) शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.