Pune : मोहोळ, धंगेकर, मोरे या 3 नगरसेवकांत रंगतदार निवडणूक

एमपीसी न्यूज – आगामी पुणे लोकसभा (Pune) निवडणुकीत माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार रवींद्र धंगेकर आणि मनसेचे गटनेते वसंतराव मोरे या 3 नगरसेवकांत प्रामुख्याने लढत होणार आहे. मोहोळ आणि धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्यावर या दोघांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. पण, वसंतराव मोरे सध्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत.

भाजपतर्फे माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देवधर, राज्यसभेचे माजी खासदार संजयनाना काकडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, या सर्वांना मागे टाकत मोहोळ यांनी उमेदवारी मिळविली. काँग्रेसमध्ये तब्बल 20 जण इच्छुक होते. या सर्वांना मागे टाकत धंगेकर यांनी उमेदवारी मिळविली. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर विजयी झाले.

Express Way Accident : पुणे-मुंबई दृतगती मार्गावर दुधाचा टँकर उलटला; एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

त्यामुळे भाजपच्या बालेकिल्ल्यात विरोधी पक्षाचा उमेदवार विजयी होऊ शकतो, असा संदेश मिळाला. त्यामुळे धंगेकर पॅटर्न संपूर्ण पुणे शहरात राबविला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले. काँग्रेसच्या वरिष्ठ मंडळीला हा दावा (Pune) पटल्याने धंगेकर यांना तिकीट देण्यात आल्याची कुजबुज सुरू आहे. धंगेकर यांना उमेदवारी मिळविल्यावर माजी नगरसेवक आबा बागुल यांनी नाराजी व्यक्त केली. निष्ठवंतांना डावलल्याची नाराजी व्यक्त केली.

आपण 100 टक्के निवडणूक लढविणार आहे. ही निवडणूक एकतर्फी होऊ देणार नसल्याचा इशारा वसंतराव मोरे यांनी दिला आहे. अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. मोरे यांनी महापालिकेत चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांनी मनसेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मोहोळ, धंगेकर आणि मोरे हे तिन्ही नगरसेवक आहेत. त्यांनी आता पुणे लोकसभा निवडणुकीचा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.