Vadgaon : ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याच्या स्पर्धेत नवा विक्रम रचत सौरभ ढोरे प्रथम

एमपीसी न्यूज – सालाबाद प्रमाणे यावर्षी (Vadgaon) श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याची स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत सह्याद्री जिम मध्ये सराव करणारा सौरभ नामदेव ढोरे याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने दगडी गोटी खांद्यावर घेत तब्बल 285 बैठका मारल्या. मागील वर्षीचा 270 बैठकांचा विक्रम त्याने मोडून नवीन विक्रम बनवला.

होळी नंतर दरवर्षी पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात दगडी गोटी उचलण्याचा शिवकालीन मर्दानी खेळ खेळला जातो. तालुक्यातील अनेक तरुण या खेळामध्ये सहभागी होतात. यावर्षी प्रथमच काही मुली देखील या खेळात सहभागी झाल्या.

यावर्षीची ही स्पर्धा सोमवारी (दि. 25) संपन्न झाली. स्पर्धेत वडगाव मधील सौरभ ढोरे याने दगडी कोटी खांद्यावर घेऊन 285 बैठका मारल्या. मागील वर्षी 270 बैठकांचा विक्रम झाला होता. हा विक्रम सौरभने मोडून नवीन विक्रम केला.

Pune : मोहोळ, धंगेकर, मोरे या 3 नगरसेवकांत रंगतदार निवडणूक

दोन वर्षांपूर्वी सौरभ ढोरे याने 85 किलो ची दगडी गोटी (Vadgaon) खांद्यावर घेऊन 222 बैठका मारून पहिला क्रमांक मिळवला होता. त्यावेळीही त्याने सन 2020 मध्ये रचलेला विक्रम मोडीत काढला होता. सौरभ हा नामांकित वेटलिफ्टर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.