Vadgaon : शिवजयंती निमित्त वडगावमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील राजे शिवजयंती महोत्सव (Vadgaon)समितीच्या वतीने 25 ते 28 दरम्यान खेळ खेळूया पैठणीचा, महाराष्ट्राची लोकधारा पोवाडा, पुरस्कार वितरण व छत्रपती शिवरायांवर आधारित नाटक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उत्सव समितीचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर, अध्यक्ष अनंता कूडे यांनी दिली.
तिर्थक्षेत्र पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात संपन्न होणाऱ्या या शिवजयंती महोत्सवाचा (Vadgaon)शुभारंभ सोमवारी (दि.25) सकाळी 9 वाजता शिवप्रतिमेचे अनावरण करून होणार आहे, त्यानंतर जय बजरंग तालीम मंडळाच्या सौजन्याने पारंपरिक शिवकालीन दगडी गोटी उचलण्याचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवारी (दि.26) रोजी सायंकाळी 4 वाजता खेळ खेळूया पैठणीचा हा महिलांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम होणार असून यासाठी अनुक्रमे मानाची पैठणी, सोन्याची नाथ व चांदीचा छल्ला ही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बुधवार (दि.27) रोजी सायंकाळी 7 वाजता शाहीर अविष्कार देशिंगे यांचा महाराष्ट्राची लोकधारा या विषयावर पोवाडा होणार आहे.
गुरुवार (दि.28) रोजी सकाळी 7 वाजता शिवप्रतीमेचे अनावरण, शिव जन्मोत्सव सोहळा व शिवज्योतींचे आगमन, सकाळी 9 वाजता विविध स्पर्धा, दुपारी 2 वाजता रांगोळी स्पर्धा व सायंकाळी 7 वाजता भव्य मिरवणूक होणार आहे. यानंतर खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते व माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात रतनबाई बाफना (राजमाता जिजाऊ), हभप पांडुरंग महाराज गायकवाड (सांप्रदायिक भूषण), ज्ञानेश्र्वर वाघमारे (कर्तव्यदक्ष), मारुती दळवी (कृषिनिष्ठ), संतोष भिलारे (युवा उद्योग रत्न) तसेच राजू माडगी यांना सन्मानित केले जाणार आहे. रात्री 8 वाजता ‘ रायबा, हेच आपले स्वराज्य ‘ हे शिवरायांच्या विचारावर आधारित नाटक होणार आहे.
उत्सव समितीचे अध्यक्ष अनंता कुडे, कार्याध्यक्ष खंडू भिलारे, कार्यक्रम प्रमुख अतिश ढोरे व दिलीप चव्हाण, उपाध्यक्ष : महेंद्र म्हाळसकर, संतोष भालेराव, अनिल ओव्हाळ, सागर मराठे, अतुल म्हाळसकर, गणेश भिलारे, गणेश गवारे, कुलदीप ढोरे, समीर गुरव, विकी म्हाळसकर, गणेश वहिले आदी नियोजन करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.