Today’s Horoscope 25 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज -Today’s Horoscope 25 March 2024– जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग-

आजचा दिवस – सोमवार.

तारीख – 25.03.2024.

शुभाशुभ विचार- करीदीन.

आज विशेष – धुलीवंदन.

राहू काळ – सकाळी 7.30 ते 09.00.

दिशा शूल – पूर्वेस असेल.

आज नक्षत्र – उत्तरा फाल्गुनी 10.38 पर्यंत नंतर हस्त.

चंद्र राशी – कन्या.
—————————–
मेष- ( शुभ रंग- भगवा)
ध्येयप्राप्ती साठी कामाचे तास वाढवावे लागतील. जुनी दुखणे अंगावर काढू नका. काही येणे असतील तर मागायला लाजू नका. आज परिश्रमातूनच यश प्राप्ती होईल.

वृषभ (शुभ रंग- पिस्ता)
नोकरदार वरिष्ठांचे मूड सांभाळतील. कलाकारांच्या उमेदवारीस यश येऊन त्यांना उत्तम संधी चालून येतील. रुग्णांच्या प्रकृतीत आज चांगलीच सुधारणा दिसून येईल.

मिथुन (शुभ रंग – तांबडा)
आनंदी व उत्साही दिवस असून सगळी कामे सुरळीत पार पाडतील. घर सजावटीसाठी काही पैसा खर्च कराल. कला क्रीडा क्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.

कर्क ( शुभ रंग- पांढरा)
सगळी महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या संध्याकाळी आर्थिक व्यवहार जपून करा विद्यार्थ्यांना आज अभ्यास कंटाळवाणा वाटेल.

सिंह ( शुभ रंग- सोनेरी)
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवीन आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. आज वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक किचकट कामे सोपी होतील.

कन्या (शुभ रंग- क्रीम)
महत्त्वाच्या चर्चेत आज तुम्ही आपल्या मतावर ठाम असाल. अति आत्मविश्वास आज नुकसानाला कारणीभूत ठरू शकेल. घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम गरजेचा असेल.

तूळ (शुभ रंग- हिरवा)
नवीन व्यवसायात मर्यादा ओळखून आर्थिक उलाढाली केलेल्या बऱ्या. मोठे आर्थिक व्यवहार उद्यावरच ढकला. आज जेष्ठ मंडळींना सत्संगातून मनःशांती मिळेल.

वृश्चिक ( शुभ रंग- स्ट्रॉबेरी)
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकाराल व त्या पूर्णही कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. आज तुम्हाला थोडी अहंकाराची बाधा होईल.

धनु (शुभरंग- चंदेरी)
नोकरीच्या ठिकाणी काही मनासारख्या घटना घडतील. सहकारी तुमच्या मताचा आदरच करतील. अधिकाराचा गैरवापर मात्र टाळा. कायद्याच्या चौकटीत राहा.

मकर (शुभ रंग- मोतिया )
नोकरी धंद्यात आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. विरोधक तुमच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करतील. अधिकारांचा वापर जपूनच करा. गुरुतुल्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.

कुंभ ( शुभरंग- मोतिया)
आज तुम्हाला थोडा थकवा जाणवेल. आजचा दिवस उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने तितकासा अनुकूल नाही. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या चुका दुर्लक्षित करा.

मीन (शुभ रंग- डाळिंबी)
तुमचे मनोबल उत्तम राहील. नोकरीच्या ठिकाणी बाढतीची चाहूल लागेल. अधिकार योग चालून ये. सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. जोडीदाराचे सल्ले योग्यच असतील.

शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.
ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार
9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.