Pimpri : आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचे तिसरे पर्व 23 एप्रिलपासून

एमपीसी न्यूज : आसवानी क्रिकेट कप’ क्रिकेट स्पर्धेचे (Pimpri) तिसरे पर्व 23 एप्रिल 2024 पासून सुरु होत आहे. पिंपरी-चिंचवड येथील मृणाल क्रिकेट ग्राउंडवर ही क्रिकेट स्पर्धा 24 दिवस चालणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ खेळणार असून, टी-10 स्वरूपात हे सामने होणार आहेत. ‘ये है पिंपरी का त्योहार’ ही टॅगलाईन घेऊन हा क्रीडा महोत्सव होत आहे, अशी माहिती स्पर्धेचे प्रमुख संयोजक, आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्सचे मालक श्रीचंद आसवानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आसवानी क्रिकेट कप स्पर्धेचा लिलाव नुकताच मृणाल क्रिकेट ग्राउंडवर झाला. त्यानंतर आसवानी यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. यावेळी 16 संघांचे संघमालक उपस्थित होते.

 

श्रीचंद आसवानी म्हणाले, “सिंधी समाजातील तरुणांमध्ये खेळ आणि तंदुरुस्तीबाबत गोडी निर्माण करण्यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले. सिंधी समाजाला व्यवसायाबरोबरच खेळातही प्रगती करण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा उपयुक्त ठरते. पहिल्या दोन्ही पर्वाना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आमची ऊर्जा वाढली आहे. एकूण 360 खेळाडूंनी लिलावासाठी नाव नोंदणी केली होती. त्यातून 192 खेळाडूंची निवड करण्यात आली. पुणे व पिंपरी-चिंचवडसह ठाणे, कल्याण, बारामती, सातारा शहरातून, तसेच कर्नाटक, गुजरात येथून खेळाडू सहभागी झाले आहेत. आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा होत असून, या स्पर्धेमुळे सिंधी समाजातील खेळाडूंना नव्या-जुन्या मित्रांसोबत खेळता येणार आहे.”

या 16 संघांचा समावेश

या स्पर्धेत पिंपरी इंडियन्स (विशाल तेजवानी-विशाल प्रॉपर्टीज), रत्नानी नाईट रायडर्स (प्रकाश रत्नानी-रोझ ग्रुप), मंगतानी टायटन्स (बग्गी मंगतानी-कोमल असोसिएट्स), तिल्वानी चार्जर्स (मयूर तिलवानी-गीता बिल्डर्स), एफएफ पुणे वॉरियर्स (फ्रेंड्स फॉरेव्हर ग्रुप), रॉयल चॅलेंजर्स वरुण (वरुण वर्यानी-एसएसडी एक्स्पोर्ट्स), केसवानी किंग्ज इलेव्हन (दीपक केसवानी-हॉटेल राधाकृष्ण), वाधवानी सनरायझर्स (पवन वाधवानी-साई वैष्णवी असोसिएट्स), मोटवानी रॉयल्स (हिरो मोटवानी-रोहित इन्फ्रा), आसवानी डेअरडेविल्स (श्रीचंद आसवानी-आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स), संत कंवरम लायन्स (लडकानी & लखवानी फॅमिली-विजयराज असोसिएट्स अँड लखवानी असोसिएट्स), देव टस्कर्स (शेरा अहुजा-सतनाम ड्रायफ्रुट्स), डायमंड (Pimpri) सुपरकिंग्ज (मनजीत सिंग वालेचा-एमएसव्ही स्टील अँड अल्युमिनियम), रामचंदानी सुपरजायंट्स (विजय रामचंदानी-एव्हीआर स्पेसेस), सिंध ब्लास्टर्स (रितेश अथवानी-एव्हीआर स्पेसेस) आणि छाब्रिया रायझिंग स्टार्स (गौरव छाब्रिया-विश्वकर्मा ग्रुप) या 16 संघांचा समावेश आहे.

Vadgaon : ऐतिहासिक दगडी कोटी उचलण्याच्या स्पर्धेत नवा विक्रम रचत सौरभ ढोरे प्रथम

 

बक्षिसांची बरसात

या स्पर्धेचे उद्घाटन 23 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. सर्व सामने युट्युब व फेसबुक पेजवरून लाईव्ह प्रक्षेपित केले जाणार असून, सर्व कुटुंबीय या स्पर्धेत प्रेक्षक म्हणून सहभागी होतील. विजेत्या संघाला 5,55,555/-, तर उपविजेत्या संघाला 3,33,333/- रुपयांचे रोख पारितोषिक व करंडक दिला जाणार आहे. यासह मॅन ऑफ द सिरीजसाठी कार, सलग 6 षटकार लावणाऱ्यास 2,51,000/- रुपयांचे रोख बक्षीस, हॅट्रिक विकेटसाठी 1,01,000/-, हॅट्रिक सिक्सेससाठी 51,000/-, प्रत्येक सामन्यातील मॅन ऑफ द मॅचसाठी 10,000/-, प्रत्येक सिक्ससाठी 1000/-, प्रत्येक चौकारासाठी 500/- रुपये बक्षीस दिले जाणार आहे.”

 

यांनी लावला स्पर्धेला हातभार

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आसवानी प्रमोटर्स अँड बिल्डर्स आहेत. मीडिया स्पॉन्सर पीसीएमसी केबल्स (अरुण शर्मा), एफएनबी पार्टनर रंगला पंजाब (रमण बिंद्रा), टॉस स्पॉन्सर सिटी कार्स (रॉकी सेवानी), जर्सी स्पॉन्सर शगुन टेक्स्टाईल्स (सुमित बोदानी), स्ट्रॅटेजिक पार्टनर द कॉर्नर लाऊंज (सनी गोगिया) व फेअर प्ले अवॉर्ड स्पॉन्सर ओम कंस्ट्रक्शन्स (पंकज केसवानी), किट स्पॉन्सर आरके पॉलिमर्स (राहुल कुकरेजा), इव्हेन्ट स्पॉन्सर थॉट वाईज (राजेश शर्मा) यांनी स्पर्धेला हातभार लावला आहे. संयोजन समितीमध्ये विजय आसवानी, हितेश बाटवा, अविनाश इसराणी, शाईल कुकरेजा, राहुल तेजवानी, सुनीत सोनवानी, जॅकी दासानी, दिनेश मुलचंदानी, ऋषी उबरानी, नीरज कृपलानी, पंकज मंगतानी, विकी चंचलानी, सुमित कटारिया व रॉकी सेवानी यांचा समावेश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.