Today’s Horoscope 26 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 26  March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 26.03.2024.

शुभाशुभ विचार- चांगला दिवस.

आज विशेष – वसंतोत्सवारंभ.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेला असेल.

आज नक्षत्र – हस्त 13.34 पर्यंत नंतर चित्रा. 

चंद्र राशी – कन्या.

—————————–

मेष ( शुभ रंग- पिस्ता)

नोकरीच्या ठिकाणी विरोधकांच्या काही उचापती चालूच राहतील. आरोग्यविषयक तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. दुकानदारांची थकलेली येणी वसूल होतील.

वृषभ (शुभ रंग- क्रीम)

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी योग्य संधी चालून येतील. नवोदित कलाकारांच्या अथक प्रयत्नांना यश येईल. रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल.

मिथुन (शुभ रंग – भगवा)

जमीन खरेदी विक्रीचे काही व्यवहार मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना किचकट विषयातही गोडी निर्माण होईल. गृहिणींना आज अजिबात उसंत मिळणार नाही.

कर्क ( शुभ रंग- सोनेरी)

आजचा दिवस धावपळीचा आहे. तुमचा आत्मविश्वास वृद्धिंगत करणारी एखादी घटना घडेल. उच्च अधिकारी असाल तर सह्या करण्यापूर्वी मजकूर नीट वाचून घ्या.

सिंह ( शुभ रंग- चंदेरी)

तुमची मिळकत उत्तम असेल. गृहिणींना अचानक करणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल. आज प्रवास त्रासदायक होऊ शकतात. फार अर्जंट नसतील तर टाळा.

कन्या (शुभ रंग- मरून)

कमी श्रमात जास्त लाभाच्या अपेक्षेने निराशाच पदरात पडू शकेल महत्वाचे निर्णय विचारांती घ्या अडचणीच्या प्रसंगी आज जोडीदाराने दिलेले सल्ले फार महत्त्वाचे असतील.

तूळ (शुभ रंग- लाल)

आज मी पणा प्रगतीच्या आड येऊ शकतो. मृदू वाणीने बरीच अवघड कामे सोपी होतील. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.

वृश्चिक ( शुभ रंग- डाळिंबी)

आजचा दिवस तुमच्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. आज केलेल्या कोणत्याही वाटाघाटी सकारात्मकतेने पार पडतील. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.

धनु (शुभरंग- स्ट्रॉबेरी)

यशस्वी लोकांच्या सहवासात आज तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. कामाच्या व्यापात आज कुटुंबीयांसाठी वेळ देणे अवघड होईल. व्यस्त दिवस.

मकर (शुभ रंग- आकाशी )

आज घरात वडीलधाऱ्या मंडळींशी काही वादविवाद संभवतात. तुम्हाला आज जरा एकांताची गरज भासेल. ज्येष्ठ मंडळींना सत्संगाकडे पावले वळवावीच लागतील.

कुंभ ( शुभरंग- जांभळा)

आपल्या कार्यक्षेत्रात स्पर्धकांना कमजोर समजू नका. नोकरीच्या ठिकाणी आज नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा. हीतशत्रू टपूनच बसलेले आहेत. सतर्क रहा.

मीन (शुभ रंग- पांढरा)

व्यवसायात भागीदारांशी सलोख्याचे संबंध असतील. वैवाहिक जीवनातही आज गोडी गुलाबी असून काही जुन्या आठवणी तुमच्या मनाला आनंद देतील. आशादायी दिवस.

        

 शुभम भवतु

श्री जयंत कुलकर्णी.

ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्लागार 

9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.